अक्षय कुमार, सुनील शेट्टी, रवीना टंडन आणि नसीरुद्दीन शाह यांच्या भूमिका असलेला ‘मोहरा’ चित्रपट ९० च्या दशकात प्रदर्शित झाला होता. त्याकाळी सुपरहिट ठरलेल्या या सिनेमातील ‘टिप टिप बरसा पानी’ हे गाणं खूप लोकप्रिय झालं. आजही कुठे ना कुठे हे गाणं आपल्याला ऐकू येतंच. या गाण्यातील रवीना आणि अक्षयच्या केमिस्ट्री आजही चर्चा होते. पण सुरुवातीला रवीनाने हा चित्रपट करण्यास नकार दिला होता आणि रवीनाही या चित्रपटासाठी निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या चित्रपटाचा सह-पटकथा लेखक शब्बीर बॉक्सवालाने एका मुलाखतीत ‘मोहरा’ चित्रपटातील किस्से सांगितले आहेत. हा चित्रपट निर्मात्यांनी काही दिवस दिव्या भारतीबरोबर शूट केला होता, पण तिच्या निधनानंतर त्यांना दुसऱ्या अभिनेत्रीची निवड करावी लागली.

‘बेबी बंप खोटा आहे’ म्हणणाऱ्यांना अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत दिला पुरावा, खरमरीत प्रश्न विचारत म्हणाली…

शब्बीरने दिलेल्या माहितीनुसार, त्यावेळी श्रीदेवी इंडस्ट्रीतील एक आघाडीची अभिनेत्री होत्या. दिव्या भारतीच्या मृत्यूनंतर जेव्हा श्रीदेवींना पहिल्यांदा चित्रपटासाठी विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी यात काम करण्यास नकार दिला. कारण त्या काळी अक्षय कुमार मोठा स्टार नव्हता, असं त्यांना वाटत होतं. श्रीदेवींनी नकार दिल्यानंतर शब्बीरने ऐश्वर्या रायचे नाव दिग्दर्शक राजीव राय यांना सुचवलं. त्यावेळी ऐश्वर्याने इंडस्ट्रीत पदार्पण केलं नव्हतं. ऐश्वर्याला चित्रपटाची ऑफर देण्यात आली पण तिने नकार दिला, कारण ती मिस वर्ल्डच्या तयारीत व्यग्र होती, असं शब्बीरने सांगितलं.

‘क्रिश’मध्ये हृतिक रोशनची भूमिका करणारा बालकलाकार आता ‘या’ क्षेत्रात करतोय काम, व्हिडीओ चर्चेत

रवीनाला अक्षयबरोबर किसिंग सीन करायचा नव्हता

शब्बीर म्हणाला, “दोन्ही अभिनेत्रींनी हा चित्रपट नाकारल्यानंतर रवीना टंडनला हा चित्रपट ऑफर करण्यात आला होता. सुरुवातीला तिनेही हा चित्रपट करण्यास नकार दिला. कारण या चित्रपटातील ‘टिप टिप बरसा पानी’ गाण्यात अक्षयला किस करण्याचा सीन होता. या सीनमुळे तिला अडचण होती. रवीनाला तिचे वडील काय विचार करतील याची भीती वाटत होती. रवीनाने हे दिग्दर्शक राजीव यांना सांगितल्यावर ते गंमतीने म्हणाले, ‘तुझ्या बाबांना हा चित्रपट दाखवू नकोस.'”

फिल्मी करिअर फ्लॉप पण लक्झरी आयुष्य जगतो सुझान खानचा भाऊ, जायेद खानच्या संपत्तीचा आकडा वाचून चकित व्हाल

३० वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता ‘मोहरा’ चित्रपट

‘मोहरा’ चित्रपट १ जुलै १९९४ रोजी रिलीज झाला होता. या ॲक्शन थ्रिलर चित्रपटाला ३० वर्षे झाली आहेत. त्या काळात तो ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटामुळे अक्षय कुमार स्टार बनला. त्याची व रवीना टंडनची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना खूप आवडली होती. याच चित्रपटाच्या शूटिंगवेळी दोघेही एकमेकांच्या जवळ आले होते. या चित्रपटातील ‘तू चीज बडी है मस्त मस्त’ आणि ‘टिप टिप बरसा पानी’ ही दोन गाणी खूप गाजली.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raveena was scared to kiss akshay kumar in tip tip barsa pani song mohra know details hrc