भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित असणारा ‘मैं अटल हूं’ या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं आहे. याबाबत दिग्दर्शक रवी जाधव आणि चित्रपटात अटल बिहारी यांची भूमिका निभावणारा अभिनेता पंकज त्रिपाठीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ‘मैं अटल हूं’ या चित्रपटाचं शूटिंग मुंबई, दिल्ली, कानपूर आणि लखनऊसह वेगवेगळ्या ठिकाणी ४५ दिवसांत झालं. मुंबईत शेवटचा सीन पार पडला. याचा व्हिडीओ रवी जाधव आणि पंकज त्रिपाठीनेही चाहत्यांसाठी शेअर केला आहे.

“अटल बिहारी वाजपेयी यांचा जीवन प्रवास अतिशय संस्मरणीय राहिला. ‘मैं अटल हूं’ या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं आहे. लवकरच अटल बिहार वाजपेयी यांच्या जीवनाचा अध्याय आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे”, असं रवी जाधव यांनी लिहित शेवटचा सीन शूट करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

Shiva
Video: आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे नवीन विघ्न? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली विनंती, म्हणाले, “कृपया आता काही…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Documentary, Solving Puzzles, Puzzles,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: कोडे सोडवण्याची गंमत…
Nayanthara News
“फक्त तीन सेकंदांच्या व्हिडीओसाठी…”, धनुषने कायदेशीर नोटीस पाठविल्याने नयनतारा भडकली; म्हणाली, “तुम्ही कशा प्रकारची व्यक्ती…”
ranbir kapoor lunch date with raha and alia
Video : लाडकी लेक कडेवर अन् अंबानींच्या नातीला पाहताच रणबीरने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया…; व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस
Earnings of the sequel Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 mumbai
दोन ‘सिक्वेल’च्या घवघवीत यशाने चित्रपटसृष्टीची दिवाळी गोड
Maharashtrachi Hasyajatra fame prithvik pratap reaction on prajakta mali phullwanti movie
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर ‘फुलवंती’ चित्रपटाची चर्चा, प्राजक्ता माळीने शेअर केला व्हिडीओ; पृथ्वीक प्रताप म्हणाला, “मला फुलवंती पेक्षा जास्त…”
Director Nikhil Advani believes that artistic films will never disappear
‘कलात्मक चित्रपट कधीच लोप पावणार नाहीत…’; दिग्दर्शक निखिल अडवाणी

हेही वाचा – Bigg Boss OTT 2: “तू मला मूर्ख बनवू शकत नाही” पूजा भट्टचा चढला पारा, जियाबरोबर झालं कडाक्याचं भांडण; म्हणाली, “विष…”

हेही वाचा – ‘मिशन इम्पॉसिबल 7’ चित्रपटासाठी टॉम क्रूजनं आकारलं ‘इतक्या’ कोटीचं मानधन, आकडा वाचून व्हाल थक्क

तसेच पंकज त्रिपाठीनं लिहिलं आहे की, “हा ‘अटल’ प्रवास अविस्मरणीय राहील. अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारख्या महान व्यक्तीची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारल्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो.”

हेही वाचा – ‘सतीची पुण्याई’ चित्रपटातील ‘तो’ सीन करणं रवींद्र महाजनींच्या बेतलं होतं जीवावर; नेमकं काय घडलं?

ज्यावेळेस या चित्रपटाचे शूटिंग लखनऊमध्ये होते, तेव्हा पंकज त्रिपाठीनं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती. यावेळेस पंकज त्रिपाठी यांनी चित्रपटाच्या कालावधीबाबत योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली होती. दरम्यान, अटल बिहारी यांच्या जीवनावर आधारित असलेला हा चित्रपट २५ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या दिवशी अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती असते; त्यामुळे आता या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.