९० च्या दशकात सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची गणना बॉलीवूडच्या लोकप्रिय जोड्यांत केली जात होती. सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची प्रेमकहाणी १९९७ मध्ये सुरू झाली होती. रिपोर्ट्सनुसार, ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान खान आणि ऐश्वर्या राय प्रेमात पडले होते. मात्र, काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर २००२ मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले.

हेही वाचा- Video: इस्रायलमध्ये अडकलेली नुसरत भरुचा सुखरुप परतली मायदेशी; व्हिडीओ आला समोर

या ब्रेकअपनंतर सलमान खानची अवस्था खूप वाईट झाली होती. अभिनेता आणि राजकीय नेते रवि किशन यांनी नुकत्याच एका मुलाखतीत सलमान खानबरोबर काम कऱण्याचा अनुभव शेअर केला आहे. दरम्यान रवि किशन यांनी तेरे नाम चित्रपटाच्या शुटींगदरम्यान सलमानच्या अवस्थेचा खुलासा केला आहे.

रवि किशन म्हणाले सलमान खूप चांगला माणूस आहे. ‘तेरे नाम’ दरम्यान सलमानची मानसिक स्थिती खूप खराब होती. त्याच्या या प्रवासाचा मी साक्षीदार आहे. चित्रपटाच्या सेटवर तो नेहमी हरवलेल्या अवस्थेत असायचा. तो आपला जास्त वेळ जिममध्ये घालवत होता. रोज दीड ते दोन तास जिम करायचा. दिवसभर शूट करायचा आणि त्यानंतरही जिमसाठी वेळ काढायचा. मी त्याच्याकडून शिकलो आहे की, काहीही झाले तरी तुम्ही आयुष्यात कितीही दुःखी असो, शूटिंगनंतर तुम्ही कितीही थकले असाल तरीही तुम्ही दीड ते दोन तास कसरत केली पाहिजे.”

हेही वाचा- “तुझा आवडता हॉलिवूड किंवा बॉलिवूड अभिनेता कोण?” प्रार्थना बेहेरे म्हणाली “त्या अभिनेत्याने…”

‘तेरे नाम’ २००३ मध्ये प्रदर्शित झाला होता. सतीश कौशिक यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात सलमानबरोबर भूमिका चावला मुख्य भूमिकेत होती. १९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या सेतु या तमिळ चित्रपटाचा हा रिमेक होता. रवी किशन यांनी या चित्रपटात सहाय्यक भूमिका साकारली होती.

Story img Loader