बॉलीवूडच्या कलाकारांविषयी चाहत्यांना नेहमीच अधिकाधिक जाणून घेण्याची उत्सुकता असते. अनेक जण या कलाकारांना आपल्या खऱ्या आयुष्यात आदर्शही मानत असतात. त्यामुळे साहजिकच हे कलाकार आपल्या खासगी आयुष्यात कसे वागतात, काय करतात हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना असते. त्याबरोबरच हे कलाकार वयाच्या विशिष्ट टप्प्यानंतरही तंदुरुस्त राहतात. त्यामुळे त्यांची दिनचर्या काय असते आणि त्यांचा आहार काय असतो, हेदेखील चाहत्यांना जाणून घ्यायचे असते. आता अभिनेत्री कतरिना कैफचा आहार काय असतो, याचा खुलासा आहारतज्ज्ञांनी केला आहे.

कशी आहे कतरिना कैफची दिनचर्या?

योग प्रशिक्षक व आहारतज्ज्ञ श्लोका शाह यांनी ‘पिंकविला’ला नुकतीच मुलाखत दिली आहे. त्यावेळी त्यांनी कतरिना कैफची दिनचर्या कशी असते आणि तिचा आहार काय असतो याबद्दल सविस्तर सांगितले आहे. त्या म्हणतात, “कतरिना तिच्या शरीराचे खूप निरीक्षण करीत असते आणि तिने तिच्या शरीराला व्यवस्थित समजून घेतले आहे. ती इंटरनेटवर जे सांगितलं जातं, त्या बाबींचा कधीच डोळे बंद करून अवलंब करीत नाही. ती अशी व्यक्ती आहे, जिला सर्व प्रश्नांची उत्तरे हवी असतात. तिला माहीत आहे, अन्न हे औषधांसारखे आहे. त्यामुळे अन्नाचा दर्जा आणि त्याचा तिच्या शरीरावर काय परिणाम होणार आहे, हे ती जाणून घेते. ती दिवसातून दोन वेळा जेवण करते आणि घरी बनविलेले जेवण करण्यास ती प्राधान्य देते. तिला तिच्या शरीराबद्दल अनेक गोष्टी माहीत आहेत आणि त्यामुळे तिला तिच्या आहारात काही बदल करायचे असतील, जसे की लोहयुक्त पदार्थ किंवा कोणता ज्युस घ्यायला पाहिजे, असे प्रश्न जेव्हा कतरिनाला पडतात तेव्हा ती माझ्याबरोबर चर्चा करते.”

Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Winter special recipe in marathi Eat sweet and sour tomato chutney with jaggery to stay healthy during winters
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खा गुळ-टोमॅटोची चटणी; रेसिपी आहे एकदम सोपी
siddharth chandekar took special ukhana for wife mitali
“मितालीचं नाव घेतो अन् गिफ्ट करतो…”, सिद्धार्थ चांदेकरने बायकोसाठी घेतला हटके उखाणा, पाहा व्हिडीओ
Ragi Upma Recipe
२ वाटी पीठापासून नाश्त्यामध्ये बनवा नाचणीचा पौष्टिक उपमा; वाचा साहित्य आणि कृती
Marathi actress alka kubal praise to shivali parab for work on mangla movie
“बऱ्याच नायिका मी किती सुंदर…”, अलका कुबल यांनी ‘मंगला’ सिनेमासाठी केलं शिवाली परबचं कौतुक; म्हणाल्या…
prajakta mali marathi actress reveals her weight
प्राजक्ता माळीचं वजन किती? भलंमोठं कॅप्शन लिहित केला खुलासा; म्हणाली, “लोक म्हणू लागलेत एवढी बारीक…”
Himanshi Khurana's Weight Loss Secret
दररोज पराठा खाणाऱ्या हिमांशी खुरानाने केले ११ किलो वजन कमी? जाणून घ्या, तज्ज्ञ याविषयी काय सांगतात?

हेही वाचा: Bigg Boss OTT : अरमान मलिक-कृतिकाच्या ‘त्या’ आक्षेपार्ह व्हिडीओवरून वाद, जिओ सिनेमाने स्पष्टीकरण देत दाखल केली तक्रार

याबरोबरच पुढे बोलताना श्लोका शाह यांनी म्हटले आहे की, कतरिना आयुर्वेदालादेखील प्राधान्य देते आणि रोजच्या आयुष्यात त्याचा वापरदेखील करते. सकाळी आणि दुपारी जेवणानंतर शतपावली करणे, ऑईल पुलिंग यांसारख्या गोष्टींना ती प्राधान्य देते.

दरम्यान, कतरिना काही दिवसांपासून विकी कौशलच्या ‘तौबा तौबा’ गाण्यातील डान्सवर तिने दिलेल्या प्रतिक्रियेमुळे चर्चेत आहे. विकी कौशलने याबद्दल खुलासा केला होता. ‘तौबा तौबा’ गाण्याआधी ती विकीला वरातीत डान्स करणारा समजत असे; मात्र हे गाणे पाहिल्यानंतर तीचा हे मत बदलले, असे अभिनेत्याने म्हटले होते. त्याबरोबरच जेव्हा कतरिनाने त्या गाण्यावरील माझ्या डान्सचे कौतुक केले तेव्हा मला ऑस्कर मिळाल्यासारखे वाटल्याचे विकीने म्हटले होते. कतरिनाच्या कामाबद्दल बोलायचे, तर ती ‘टायगर व्हर्सेस पठाण’ चित्रपटात अभिनय करताना दिसणार आहे.

Story img Loader