चित्रपटाच्या सेटवर बॉलीवूड कलाकारांमधील भांडणे ही एक सामान्य गोष्ट आहे. बॉलीवूडमधील भांडणाचे असे अनेक किस्से आपण ऐकले आणि पाहिले असतील. मात्र, आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील अशा दोन अभिनेत्रींच्या वादाबाबात माहिती देणार आहोत ज्या एकेकाळी जिवलग मैत्रिणी मानल्या जायच्या. मात्र, आता त्यांच्यात एवढा दुरावा आला आहे की, त्या एकमेकींबरोबर बोलणं तर लांबच पण तोंडसुद्धा बघत नाहीत. या अभिनेत्री दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चन आणि राणी मुखर्जी आहे. मात्र, नेमक असं काय घडलं ज्यामुळे या दोघींत एवढा दुरावा आला? जाणून घेऊया या वादामागचे नेमकं कारण..

हेही वाचा- रजनीकांत यांच्या मुलीचे दागिने चोरीप्रकरणी दोघांना अटक; ऐश्वर्याकडे १८ वर्षे काम करणाऱ्या मोलकरणीने कोट्यवधींचे दागिने विकून…

shah rukh khan
शाहरुख खानने आर्यन व सुहानासाठी चाहत्यांना केली ‘ही’ विनंती; म्हणाला, “त्यांना ५० टक्के प्रेम…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
laxmi narayan tripathi on mamta kulkarni
ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर केलं अन् तिच्यासह झाली हकालपट्टी; त्रिपाठी म्हणाल्या, “तिने इस्लाम…”
Namdeo Shastri On Dhananjay Munde
Namdeo Shastri : “भगवान गड धनंजय मुंडेंच्या भक्कमपणे पाठिशी”, नामदेव शास्त्री महाराज यांनी मांडली भूमिका
Sanjay Raut on Chandrakant Patil Statment
Sanjay Raut : शिवसेना-भाजपा युतीच्या चर्चांवर संजय राऊतांची रोखठोक भूमिका, चंद्रकांत पाटलांचा उल्लेख करत म्हणाले…
tejashri pradhan shares photo with amruta bane
“खरी मैत्रीण…”, ‘प्रेमाची गोष्ट’मधून Exit घेतल्यावर तेजश्री प्रधानने मालिकेतल्या ‘या’ अभिनेत्रीसह शेअर केला फोटो, म्हणाली…
Urvashi Rautela
उर्वशी रौतेलाने ट्रोल करणाऱ्यांना दिलं उत्तर; म्हणाली, “लोक सलमान खान आणि शाहरूख खानला सोडत नाहीत तर…”
Satguru Mata Sudiksha
मानवीय गुणांनी युक्त असणे हीच मानवाची खरी ओळख – माता सद्गुरू सुदीक्षाजी महाराज

ऐश्वर्या राय आणि राणी मुखर्जीमधील वादाची सुरुवात ‘चलते चलते’ चित्रपटामुळे झाली होती. या चित्रपटातील नायिकेच्या मुख्य भुमिकेसाठी सुरुवातीला ऐश्वर्याची निवड करण्यात आली होती. पण त्या काळात ती सलमान खानसोबत रिलेशनशिपमध्ये होती आणि सलमान सेटवर खूप गोंधळ घालायचा. एकदा सलमानने सेटवर एवढा मोठा गोंधळ घातला की शाहरुखला मध्यस्थी करावी लागली. मात्र, चिडलेल्या सलमनाने शाहरुखलाही चार शब्द ऐकवले. या घटनेनंतर शाहरुखला राग आला आणि त्याने ऐश्वर्याला रिपलेस करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा- अमिताभ बच्चन यांचे ‘शहेनशाह’ चित्रपटातील ‘स्टील जॅकेट’ आता आहे तरी कुठे? बिग बी गुपित उघड करत म्हणाले…

ऐश्वर्याला चित्रपटातून काढून टाकल्यानंतर शाहरुखने राणी मुखर्जीला हा चित्रपट ऑफर केला आणि राणीचे क्षणाचाही विलंब न लावता चित्रपट साइन केला. ज्यावेळी या चित्रपटात ऐश्वर्याची जागा राणीने घेतली, त्यावेळी दोघीही जवळच्या मैत्रिणी होत्या. राणी आणि ऐश्वर्या एकमेकांच्या सुख-दु:खात एकत्र उभ्या दिसल्या. पण या घटनेनंतर ऐश्वर्याला आपली फसवणूक झाल्याचे वाटले कारण शाहरुख आणि राणी दोघेही तिचे खूप चांगले मित्र होते. त्यानंतर ऐश्वर्या आणि राणीमध्ये दुरावा निर्माण झाला.

हेही वाचा- ‘भोला’साठी अजय देवगणने आकारले ‘इतके’ कोटी; तब्बूच्या मानधनाचा आकडा ऐकून व्हाल थक्क

या जोडीच्या मैत्रीत दरी निर्माण होण्यामागे अभिषेक बच्चन देखील एक कारण असल्याचे बोलले जात आहे. राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन यांनी ‘बंटी और बबली’, ‘कभी अलविदा ना कहना’, ‘बस इतना सा ख्वाब है’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. या जोडीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री त्यांच्या ऑफस्क्रीन केमिस्ट्रीइतकीच चांगली होती. त्यादरम्यान अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी यांच्या नात्याच्या बातम्यांनीही चांगलाच जोर धरला होता.

हेही वाचा- “मला चित्रपटातून काढा…” सारा अली खानने सांगितला ‘अंतरंगी रे’ बद्दलचा ‘तो’ किस्सा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिषेक बच्चनची आई जया बच्चन यांना राणीने आपली सून व्हावे असे वाटत नव्हते, त्यामुळे हे जोडपे वेगळे झाले. राणीसोबतच्या ब्रेकअपनंतर अभिषेकने ऐश्वर्याशी लग्न केले. या लग्नात राणी मुखर्जीला निमंत्रितही करण्यात आले नव्हते. राणीने स्वत: एका मुलाखतीत सांगितले की, जर तिला बोलावले गेले तर ती नक्कीच जाईल. त्यानंतर राणी आणि ऐश्वर्या कधीच एकमेकांसोबत दिसल्या नाहीत. आजही बहुतांश कार्यक्रमांमध्ये त्या दोघी एकमेकांसमोर येणे टाळतात.

Story img Loader