आमिर खान व रीना दत्ता यांची मुलगी आयरा खान लग्नबंधनात अडकली आहे. आयरा खान व नुपूर शिखरे यांनी ३ जानेवारी रोजी मुंबईमध्ये नोंदणी पद्धतीने विवाह केला, नंतर १० जानेवारी रोजी उदयपूरमध्ये कुटुंबीय व मित्रांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे फोटो व व्हिडीओ सध्या चर्चेत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयरा खानच्या लग्नात आमिर खान व तिची आई रीना दत्ता पालकांची जबाबदारी पार पाडताना दिसले. आमिर व रीनाचा घटस्फोट झाला आहे, पण मुलीच्या लग्नासाठी ते सर्वजण एकत्र आले होते. आता रीना दत्ताने इन्स्टाग्रामवर मुलीच्या लग्नातील फोटो शेअर करत त्याला छान कॅप्शन दिलं. ‘मी नेहमीच तुझ्या पाठीशी आहे, आयरा मी तुझ्यावर खूप प्रेम करते,’ असं कॅप्शन रीनाने या फोटोला दिलं आहे.

आमिर खानची विहीणबाईंसह कँडिड पोज, आयरा-नुपूरच्या लग्नात खान कुटुंबाचा Family Photo अन्…; पाहा खास क्षण

आईच्या या पोस्टवर आयराने कमेंट करत ‘त्यामुळेच मला सुरक्षित वाटतं, आई माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे,’ असं म्हटलं. या फोटोवर रीनाचा जावई नुपूर शिखरेने रेड हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. दरम्यान, आता नुपूर व आयराच्या रिसेप्शनची तयारी सुरू आहे. या रिसेप्शन सोहळ्याला २५०० हून अधिक पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.