अलीकडच्या काळात अनेक मराठी कलाकार बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत असल्याचं आपण पाहिलं आहे. सई ताम्हणकर, उपेंद्र लिमये, अमृता खानविलकर, अमेय वाघ, चिन्मय मांडलेकर, सिद्धार्थ जाधव, तेजस्विनी पंडित, गिरीजा ओक, क्षिती जोग यांसारख्या कलाकारांनी गेल्या काही वर्षांत अनेक गाजलेल्या बॉलीवूड चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आणि प्रेक्षकांचं मन जिंकलं. आता लवकरच आणखी एक मराठी अभिनेता बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या उपेंद्र लिमयेंच्या ‘अ‍ॅनिमल’मधील कॅमिओची सर्वत्र चर्चा होत असताना आता आणखी एक मराठी अभिनेता आता बॉलीवूड गाजवणार आहे. तो अभिनेता म्हणजेच ‘रेगे’ चित्रपटातून घराघरांत लोकप्रिय झालेला आरोह वेलणकर. त्याने काही वर्षांपूर्वी ‘बिग बॉस मराठी’मध्येही सहभाग घेतला होता. मराठी नाटक व चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यावर आता लवकरच आरोह बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

हेही वाचा : हार्दिक जोशीच्या ‘जाऊ बाई गावात’नंतर ‘झी मराठी’वर लवकरच सुरू होणार नवीन रिअ‍ॅलिटी शो, जाणून घ्या…

आरोह वेलणकरने इन्स्टाग्राम पोस्टसह शूटिंगच्या सेटवरचे फोटो शेअर करत यासंदर्भात माहिती दिली. या फोटोंवरुन आरोह कार्तिक आर्यनच्या आगामी चित्रपटात झळकणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. तसेच या चित्रपटाचं दिग्दर्शन कबीर खान करणार आहे. शेअर केलेल्या फोटोंच्या कॅप्शनमध्ये अभिनेता लिहितो, “सिनेमाच्या शूटिंगचा शेवटचा दिवस! चांगल्या लोकांची साथी मिळाल्यामुळे मला एका चांगल्या प्रोजेक्टचा भाग होता आलं. माझा हा पहिला हिंदी चित्रपट पुढच्यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येईल. तोपर्यंत प्रतीक्षा करा…”

हेही वाचा : “माझा गोड उमेश”, नवऱ्याच्या वाढदिवशी प्रिया बापटची रोमँटिक पोस्ट; म्हणाली…

दरम्यान, आरोह वेलणकरच्या पोस्टवर मराठी कलाविश्वातील कलाकार आणि त्याच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. प्रार्थना बेहेरे, अभिषेक देशमुख, विशाल निकम, गायत्री दातार या कलाकारांनी भावी वाटचालीसाठी आरोहला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rege fame aroh welankar will share screen with bollywood star kartik aaryan sva 00