RHTDM : आर माधवन आणि दिया मिर्झा यांची जादुई केमिस्ट्री पाहण्याची संधी प्रेक्षकांना २३ वर्षांनी पुन्हा एकदा मिळाली आहे. ‘रहना है तेरे दिल में’ हा बॉलीवूडचा एव्हरग्रीन चित्रपट १९ ऑक्टोबर २००१ रोजी प्रदर्शित झाला होता. चित्रपटाची कथा, यातील गाणी, संवाद प्रत्येक गोष्टीने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आजही सोशल मीडियावर सर्वत्र ‘रहना है तेरे दिल में’ चित्रपटाची गाणी ट्रेडिंग असतात. त्यामुळे २३ वर्षांनी पुन्हा प्रदर्शित झाल्यावर हा चित्रपट काय जादू करणार याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलं होतं.
अखेर ३० ऑगस्ट रोजी ‘रहना है तेरे दिल में’ हा चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित झाला आणि अपेक्षेनुसार प्रेक्षकांमध्ये पुन्हा एकदा तोच उत्साह पाहायला मिळाला. खरंतर २००१ मध्ये प्रदर्शित झाल्यावर हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. दिया मिर्झाने याबाबत ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत “रहना है तेरे दिल में’ फ्लॉप झाल्यामुळे मला अनेक चित्रपटांमधून हटवण्यात आलं होतं” असं देखील सांगितलं होतं. पुढे, हा चित्रपट टेलिव्हिजनवर प्रसारित करण्यात आल्यावर लोकप्रिय ठरला होता. रिपोर्ट्सनुसार, ‘रहना है तेरे दिल में’ चित्रपटाने २००१ मध्ये चांगली कमाई केली होती. परंतु, मेकर्सनी हा चित्रपट डिस्ट्रीब्यूटर्सला विकला होता. यामुळे याचा फायदा टीमला झाला नाही. याशिवाय सुरुवातीला चित्रपटाचा ट्रेलर आणि गाण्यांना फारसा प्रतिसाद मिळाल नव्हता.
हेही वाचा : Video : बाईSSS हा काय प्रकार! मराठी अभिनेत्रींमध्ये ‘बिग बॉस’ची क्रेझ; चक्क हॉटेलमध्ये पाहिला भाऊचा धक्का, म्हणाल्या…
RHTDM पहिल्या दिवशी कमावले…
‘रहना है तेरे दिल में’ ( RHTDM ) टीव्हीवर प्रसारित झाल्यावर सर्वत्र लोकप्रिय झाला. या चित्रपटाची आजही सर्वत्र चर्चा होते आणि याचमुळे आता २३ वर्षांनी पुन्हा एकदा प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांनी चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला आहे. सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, भारतात जवळपास २०० सिनेमागृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. २० ऑगस्टला पहिल्याच दिवशी या चित्रपटाने १० लाखांहून अधिक कमाई केली आहे. २३ वर्षांपूर्वी ओपनिंग डेला चित्रपटाने ४१ लाख कमावले होते. त्यामुळे तुलना केल्यास आता चित्रपटाने २४ टक्के अधिक कमाई केली आहे.
हेही वाचा : “निक्की पुराण ऐकायला दीड तास वाया…”, भाऊचा धक्का पाहून नेटकरी नाराज! म्हणाले, “रितेश भाऊ…”
शनिवार आणि रविवारी बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. याचं कारण, म्हणजे चित्रपटाचे बहुतांश शो हाऊसफुल्ल झाले आहेत. अभिनेता आर माधवने यासंदर्भात स्टोरी शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. त्यामुळे वीकेंडला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय जादू करणार याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलेलं आहे.
दरम्यान, ‘रहना है तेरे दिल में’ ( RHTDM ) चित्रपटात आर माधवन, दिया मिर्झा, सैफ अली खान, अनुपम खेर, स्मिता जयकर, व्रजेश हिरजी यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.