बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री रेखा यांचा आज वाढदिवस आहे. दमदार अभिनयाच्या जोरावर त्यांनी एकेकाळी बॉलिवूड गाजवलं होतं. त्यांचे लाखो चाहते आहेत. आजही रेखा त्यांच्या सौंदर्याने कित्येकांना भूरळ पाडतात. ७०च्या दशकात बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या रेखा आणि बिग बी अमिताभ बच्चन यांचं प्रेमप्रकरण गाजलं होतं. एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा रेखा आणि अमिताभ बच्चन यांचा असाच एक किस्सा आहे.

१९७७ मध्ये रेखा आणि अमिताभ बच्चन ‘गंगा की सौंगध’ या चित्रपटासाठी जयपूर शहरात शूटिंग करत होते. बॉलिवूडमधील या दिग्गज कलाकरांना पाहण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. त्यातीलच एक जण रेखा यांच्याकडे पाहून अश्लील कमेंट करत होता. चित्रपटाच्या टीमने त्या व्यक्तीला असे कमेंट पास करू नये म्हणून बजावलं. परंतु, त्या चाहत्याने पुन्हा रेखा यांच्यावर कमेंट केली. ते ऐकून अमिताभ बच्चन यांना राग अनावर झाला आणि त्यांनी त्या व्यक्तीला ठोसा मारला.

हेही वाचा >> Video : मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साखरपुड्याला हृतिक रोशनने लावली हजेरी, पाहा व्हिडीओ

शूटिंगदरम्यान घडलेल्या या प्रसंगाची बॉलिवूडमध्येही खूप चर्चा रंगली होती. परंतु, रेखा किंवा अमिताभ बच्चन या दोघांपैकी कोणीही या प्रसंगाबद्दल कुठेही वाच्यता केलेली नाही. नेहमी शांत दिसणारे अमिताभ बच्चन आक्रमक झाल्याचं ऐकून प्रेक्षकही आश्चर्यचकित झाले होते. यासिर उस्मान यांनी रेखा यांच्या जीवनावर लिहिलेल्या ‘रेखा-द अनटोल्ड स्टोरी’ या पुस्तकात हा प्रसंग आहे.

हेही पाहा >> Bigg Boss Marathi 4: बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल समृद्धी जाधव बनली ‘बिग बॉस’च्या घरातील पहिली कॅप्टन, जाणून घ्या तिच्याबद्दल

सुलतान अहमद दिग्दर्शित ‘गंगा की सौंगध’ हा चित्रपट १९७८ साली प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी दरोडेखोराची भूमिका साकारली होती. तर रेखाही मुख्य भूमिकेत होत्या.

Story img Loader