बॉलिवूडमधील सदाबहार अभिनेत्री रेखा यांचे असंख्य चाहते आहेत. त्यांच्या अभिनयाने आणि सौदर्यांने अनेकांची मनं जिंकली आहेत. अनेक दशकांपासून चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या रेखा यांनी अमाप संपत्ती आणि प्रसिद्धी मिळवली. चित्रपटांमधील करिअर व्यतिरिक्त रेखा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत राहिल्या. रेखा यांनी अमिताभ यांच्याशी ब्रेकअपनंतर अनेक वाईट दिवस पाहिले आहेत. रेखांना आयुष्यात प्रेम कधीच मिळालं नाही.
सोनाक्षी सिन्हा हुबेहुब तुमच्यासारखी का दिसते? यावर रीना रॉय यांनी सोडलं मौन, म्हणाल्या…
अमिताभ बच्चन यांच्यापासून वेगळे झाल्यानंतर रेखा यांनी उद्योगपती मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केलं होतं. लग्न करून रेखा आयुष्यात स्थिरावणार असं म्हटलं जात होतं. पण तसं झालं नाही. कारण, लग्नानंतर काही काळातच रेखा आणि मुकेश यांच्यात मतभेद सुरू झाले.
‘झी न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, लग्नानंतर मुकेश डिप्रेशनमध्ये गेले होते. लग्नानंतर सहा महिन्यांनी एके दिवशी मुकेश अग्रवाल यांच्या आत्महत्येची बातमी समोर आली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुकेश यांनी रेखाच्या ओढणीने गळफास लावून घेतला होता. या घटनेने रेखा यांना चांगलाच धक्का बसला होता. अशातच रेखामुळेच पती मुकेश अग्रवाल यांनी आत्महत्या केल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला होता.
मुकेश यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहिली होती. त्यात रेखासाठी आपण आपली कोणतीही संपत्ती सोडत नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. रेखा स्वतः इतकी सक्षम आहे की ती कमवू शकते, असं कारण त्यांनी दिलं होतं. दरम्यान, मुकेश यांच्या मृत्यूसाठी रेखाला जबाबदार धरलं गेलं होतं. पण मुकेश अग्रवाल यांच्या कुटुंबाने रेखांवरील सर्व आरोप फेटाळले होते. ‘रेखा यांनी आमच्याकडे कधीच काही मागितलं नाही’, असं ते म्हणाले होते.
रेखा यांनी अभिनेता विनोद मेहराशी लग्न केलं होतं पण हे लग्न देखील टिकू शकलं नव्हतं.