जगातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी व नीता अंबानींच्या ‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र’ चा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला बॉलिवूडमधील सिनेतारकांनी हजेरी लावली होती. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या उपस्थितीने या सोहळ्याला चार चांद लागले. या सोहळ्यातील अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अंबानींच्या या सोहळ्याला प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांनीही हजेरी लावली होती. याबरोबरच ऐश्वर्या राय बच्चन लेक आराध्यासह उपस्थित होती. या कार्यक्रमादरम्यान रेखा यांनी अमिताभ बच्चन यांच्या नातीबरोबर फोटोसाठी पोझही दिल्या. रेखा यांचे आराध्याबरोबरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत.

हेही वाचा>> Video: कार्यक्रमादरम्यान गरोदर सुनेची काळजी घेताना दिसले मुकेश अंबानी; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव, म्हणाले…

हेही पाहा>> Photos: अंबानींच्या मोठ्या सुनेचं मॅटर्निटी फोटोशूट, श्लोका अंबानीने फ्लाँट केलं बेबी बंप, पाहा फोटो

अंबानींच्या सोहळ्यातील काही फोटो विरल भय्यानी या पापाराझी पेजवरुन शेअर करण्यात आले आहेत. या फोटोंमधील रेखा व आराध्या यांच्या फोटोने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. “रेखा त्यांच्या नातीबरोबर” अशी कमेंट एकाने केली आहे.

rekha with aradhya bachchan

तर दुसऱ्याने “ऐश्वर्या व आराध्याबरोबर रेखा मॅम” असं म्हटलं आहे.

rekha with aradhya bachchan

“रेखा मॅम : माझी नात माझी नात” अशी कमेंट केली आहे.

rekha with aradhya bachchan

‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र’ च्या उद्घाटन सोहळ्यातील अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यापैकी रेखा व आराध्याच्या फोटोंनी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.

Story img Loader