बॉलिवूडमध्ये अनेकदा आपण दोन कलाकारांमधील भांडणे पाहिली असतील. कधीकधी कलाकार एकमेकांवर रागावतात तर कधी त्यांच्यावर हातही उचलतात. मात्र एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान रेखा यांनी हृतिक रोशनला जोरदार चापट मारल्याची घटना घडली होती. ‘कोई मिल गया’ या चित्रपटादरम्यान रेखा यांनी रागाच्या भरात हृतिकला जोरदार थप्पड मारली, त्यानंतर हृतिकचा गाल काही काळ सुन्न झाला होता. पण रेखांनी त्याला चापट का मारली? तुम्हाला माहिती आहे का?
हेही वाचा- ट्रकवरची एक ओळ वाचून सुचलं होतं ‘पसूरी’ गाणं; पाकिस्तानी गायकाने सांगितला किस्सा
‘कोई मिल गया’ चित्रपटात रेखांनी हृतिकच्या आईची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील एका सीनमध्ये त्यांना हृतिकला चापट मारायची होती. शूटिंग सुरू होण्यापूर्वी रेखा यांनी हृतिक रोशनला सांगितले होते की, या सीनमध्ये खरेपणा आणण्यासाठी जर मी तुला जोरात चापट तर तू त्यासाठी तयार राहिशील . रेखा त्याच्यासोबत मस्करी करत आहे असे हृतिक रोशनला वाटत होते. मात्र, सीन सुरू होताच रेखांनी त्याला जोरदार चापट मारली.
हेही वाचा- ‘सत्यप्रेम की कथा’ पहिल्याच दिवशी कमवू शकतो ‘इतके’ कोटी; ट्रेड एक्स्पर्ट्सनी वर्तवला अंदाज
हा सीन शूट केल्यानंतर हृतिककडे गालाला हात लावण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.ही चापट इतकी जोरात होती की हृतिक पूर्ण गाल सुन्न पडला होता. हा चित्रपट २००३ साली प्रदर्शित झाला होता आणि या चित्रपटाचे बजेट सुमारे ३५० कोटी होते, परंतु लोकांनी या चित्रपटाला इतके प्रेम दिले की बॉक्स ऑफिसवर ८०० कोटींहून अधिक कमाई केली होती.