सोनाक्षी सिन्हाने सहा महिन्यांपूर्वी तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी लग्न केलं. नुकतीच तिने तिच्या आयुष्यातील ‘दोन सर्वात खास पुरुष’ तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा आणि पती झहीर यांच्यासाठी वाढदिवसाची खास पार्टी दिली. शत्रुघ्न सिन्हा यांना ९ डिसेंबरला वाढदिवस होता, तर झहीरचा वाढदिवस १० डिसेंबरला होता. सोनाक्षीने या पार्टीतील सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ तिच्या यूट्यूब चॅनेलवर शेअर केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोनाक्षीने व्हिडीओत सांगितलं की तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा व पती झहीर इक्बाल दोघांनी पहिल्यांदाच एकत्र वाढदिवस साजरा केला. तिचे भाऊ लव आणि कुश सिन्हा जूनमध्ये सोनाक्षीच्या लग्नाला आले नव्हते, तसेच ते या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये दिसले नाहीत. या बर्थडे पार्टीला ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांनीही हजेरी लावली होती. रेखा यांनी पार्टीत एंट्री केल्यावर लगेच त्या शत्रुघ्न सिन्हांच्या पायाला स्पर्श करण्यासाठी धावल्या.

हेही वाचा – २५ दिवसांत १६ किलो वजन घटवलं अन्…; बॉलीवूड अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला, “मी अत्यंत मूर्खासारखा…”

रेखा आणि शत्रुघ्न यांच्यात आठ वर्षांचे अंतर आहे आणि त्यांनी ‘खून भरी मांग’, ‘रामपूर का लक्ष्मण’ यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. पार्टीत झहीरने रेखा यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले.

सोनाक्षीचे मॅगझीन कलेक्शन

व्हिडिओच्या दुसऱ्या भागात सोनाक्षीने तिच्या फिल्म मॅगझीनचे कलेक्शन दाखवले. या सर्व मॅगझीनच्या कव्हरवर तिचे वडील आहेत. १९७२ पूर्वीच्या या मॅगझीन तिने नीट प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये काळजीपूर्वक जपून ठेवली आहेत.

हेही वाचा – अमेरिकेत शिकतेय प्रसिद्ध अभिनेत्याची एकुलती एक लेक; म्हणाला, “मी २० तास प्रवास करून गेलो अन् ती…”

सोनाक्षी व झहीर जून २०२४ मध्ये एका खासगी सोहळ्यात नोंदणी पद्धतीने लग्न केलं. मुंबईतील सोनाक्षीच्या घरी हा विवाहसोहळा पार पडला आणि त्यात तिचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते. तिचा भाऊ लव आणि कुश या लग्नाला उपस्थित नव्हते. सोनाक्षीने तिच्या भावाच्या अनुपस्थितीबद्दल कधीच भाष्य केलं नाहीत. पण एकदा शत्रुघ्न सिन्हा यांनी यावर प्रतिक्रिया दिली होती.

“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण

“मी त्याबद्दल तक्रार करणार नाही. पण ते कदाचित अजूनही एवढे परिपक्व झाले नाहीत. मला त्यांचा त्रास आणि गोंधळ कळतोय. सांस्कृतिक फरकांबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया अशाच काहिशा असतात. कदाचित, मी त्यांच्या वयाचा असतो, तर मीही अशीच प्रतिक्रिया दिली असती. पण, इथे तुमची परिपक्वता, वय आणि अनुभव कामी येतो. त्यामुळे माझी प्रतिक्रिया माझ्या मुलांइतकी टोकाची नव्हती,” असं ते लेहरेन रेट्रोशी बोलताना म्हणाले होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rekha touches shatrughan sinha feet luv kush sinha missed zaheer iqbal birthday party hrc