अमिताभ बच्चन व रेखा यांच्या अफेअरची बॉलीवूडमध्ये एकेकाळी खूप चर्चा झाली होती. दोघांचंही एकमेकांवर प्रेम होतं, पण ते वेगळे झाले. त्यानंतर बिग बींनी जया बच्चन यांच्याशी लग्न केलं. दोघांच्या लग्नाला ५० वर्षे झाली आहेत. रेखा व बिग बी ब्रेकअपनंतर इतक्या वर्षांत कधीच समोरासमोर आल्याचं घडलं नाही, पण रेखा व जया बच्चन यांचे एकमेकींशी गप्पा मारतानाचा, गळाभेट घेतानाचे अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असतात.
जया बच्चन म्हणजेच लग्नाआधीच्या जया भादुरी व रेखा यांची खूप चांगली मैत्री होती. इतकंच नाही तर त्या दोघी एका इमारतीत राहायच्या आणि जया रेखांना करिअर अन् आयुष्यासंदर्भात महत्त्वाचे सल्ले द्यायच्या, इतक्या जवळच्या त्या मैत्रिणी होत्या, असा दावा ‘रेखा: द अनटोल्ड स्टोरी’ या पुस्तकात करण्यात आला आहे. रेखा यांच्या आयुष्यावरील हे पुस्तक यासर उस्मान यांनी २०१६ मध्ये लिहिलं होतं. या पुस्तकात ‘दीदीभाई’ नावाने जया बच्चन यांच्याशी संबंधित काही किस्से सांगितले आहेत. यात रेखा व जया यांच्या मैत्रीबद्दलही लिहिलं आहे.
अमिताभ, जया व रेखा लाँग ड्राइव्हवर जायचे एकत्र; ‘ते’ दोघेही पुढच्या सीटवर बसायचे अन् मागे…
रेखा जया यांना ‘या’ नावाने मारायच्या हाक
“रेखा यांचे करिअरमधील काही सुरुवातीचे चित्रपट हिट झाल्यावर त्यांनी १९७२ साली मुंबईत स्वतःचा फ्लॅट विकत घेतला होता. त्यापूर्वी त्या हॉटेल अजिंठामध्ये राहायच्या. फ्लॅट घेतल्यावर हॉटेल सोडून रेखा वयाच्या १८ व्या वर्षी जुहूच्या बीच अपार्टमेंटमध्ये राहायला गेल्या होत्या. त्याच बिल्डिंगमध्ये अभिनेत्री जया भादुरी राहत होत्या. तेव्हा जया हिंदी इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होत्या व खूप यशस्वी होत्या. बीच अपार्टमेंटमध्ये राहताना रेखा आणि जया अनेकदा भेटत असत. रेखा प्रेमाने जयांना ‘दीदीभाई’ म्हणायच्या आणि त्यांच्याबरोबर वेळ घालवण्यासाठी वारंवार त्यांच्या फ्लॅटवर जायच्या. तिथेच रेखा यांची पहिली भेट जयांचे प्रियकर अमिताभ बच्चन यांच्याशी झाली होती,” असं वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने पुस्तकाच्या संदर्भाने दिलं आहे.
एव्हरग्रीन Couple! २८ वर्षांपूर्वी ‘असे’ दिसायचे ऐश्वर्या व अविनाश नारकर, लग्नाचा फोटो पाहिलात का?
अमिताभ व जयांबरोबर लाँग ड्राइव्हवर जायच्या रेखा
रेखा, अमिताभ व जया हे तिघेही एकत्र लाँग ड्राइव्हला जायचे, असा उल्लेख ‘मेहमूद: अ मॅन ऑफ मेनी मूड्स’ या पुस्तकात आहे. “अमिताभ आणि अन्वर (मेहमूदचे भाऊ) जवळचे मित्र होते. अन्वरने मला सांगितलं की त्याने अमिताभ आणि जया यांना अनेकदा लाँग ड्राईव्हवर नेलं होतं. दोघे कारच्या पुढच्या सीटवर बसायचे, तर रेखा मागच्या सीटवर बसायच्या आणि ते प्रवासात एकमेकांशी गप्पा मारायचे.”