अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता प्रभास हे मनोरंजन सृष्टीतील दोन आघाडीचे कलाकार आहेत. सध्या या दोघांचे नाव सर्वात जास्त मानधन घेणाऱ्यांच्या यादीतही सामील आहे. यांचे चित्रपट पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. पण आता पहिल्यांदाच दीपिका आणि प्रभास एकत्र काम करताना दिसणार असल्याची बातमी मध्यंतरी समोर आली होती. तर काही दिवसांपूर्वी त्यांच्या या चित्रपटात अमिताभ बच्चनही दिसणार असल्याचे समोर आले होते. या चित्रपटाचे नाव आहे ‘प्रोजेक्ट के.’ पण आता प्रभास आणि दीपिकाच्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी आहे.
आणखी वाचा : सुनिता आणि अनिल कपूर यांच्याकडून नातवाला मिळाली ‘ही’ खास भेट, फोटो शेअर करत सोनमने व्यक्त केला आनंद
अमिताभ बच्चन, प्रभास आणि दीपिका पदुकोण यांच्या ‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटाची चाहते खूप दिवसांपासून आणि आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाबाबत वरचेवर नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. लवकरच या चित्रपटाचे शूटिंग सुरु होणार असल्याचेही बोलले जाते. पण आता निर्मात्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या एकाच दिवशी अनेक चित्रपट प्रदर्शित होतात आणि त्याचा परिणाम बॉक्स ऑफिसवर दिसून येतो. त्यामुळे कोणताही चित्रपट चांगली कमाई करू शकत नाही. म्हणून ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे.
अमिताभ बच्चन, प्रभास आणि दीपिका पदुकोण यांच्या ‘प्रोजेक्ट के’ या स्टार्सच्या आगामी चित्रपटाच्या रिलीजच्या तारखेत बदल करण्यात आल्याची माहिती आहे. रिपोर्टनुसार, ‘प्रोजेक्ट के’ २०२४च्या ईदला रिलीज होणार होता. मात्र त्याच दिवशी सलमान खान आणि दिग्दर्शक अली अब्बास जफर यांचाही एक चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने ‘प्रोजेक्ट के’च्या निर्मात्यांना ही टक्कर टाळायची आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे.
हेही वाचा : ऐतिहासिक आणि पौराणिक चित्रपटांबाबत सुरु असलेल्या वादांवर शरद केळकरने सोडले मौन; म्हणाला…
आता अमिताभ बच्चन, प्रभास आणि दीपिका पदुकोण यांच्या ‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटाचे शूटिंग सुरू असून या चित्रपटाचे शुटिंग २०२२ च्या शेवटी किंवा २०२३ च्या सुरुवातीला पूर्ण होईल असे बोलले जात आहे. पण अद्याप निर्मात्यांनी याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. त्यामुळे दीपिका आणि प्रभासच्या चाहत्यांना या चित्रपटासाठी आणखी काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.