बॉलिवूडमधील अभिनेत्री जशा आपल्या अभिनयासाठी, लूकसाठी चर्चेत असतात, तशाच त्या वादात सापडल्याने चर्चेत येत असतात. जॅकलिन फर्नांडिस सुकेश प्रकरणामुळे चर्चेत आली आहे. कथित आरोपी सुकेश चंद्रशेखरशी संबंधित २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात दिल्लीच्या पटियाला न्यायालयात आज सुनावणी झाली आहे. आता या प्रकरणात सध्या तिला मोठा दिलासा मिळालेला आहे. तिच्या अंतरिम जामिनाला १० नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
याआधी २६ सप्टेंबर रोजी ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केला होता. ईडीने आपल्या आरोपपत्रात जॅकलिन फर्नांडिसला आरोपी म्हंटले आहे. आज वकिलांच्या बरोबरीने न्यायालयात हजर झाली होती. ईडीने मात्र या जामिनावर आक्षेप घेतला आहे. ईडीचे असे म्हणणे आहे की, जॅकलिनने चौकशी दरम्यान पुरव्यांमध्ये अफरातफर केली आहे तसेच मोबाइलमधील सगळी माहिती डिलीट केली आहे. चौकशी दरम्यान तिने देशातून पळून जाण्याचा प्रयत्न केला आहे. ईडीचे असेही म्हणणे आहे की, जॅकलिनने चौकशीत कधीच सहकार्य केले नाही.
जॅकलिनवर आरोप कोणते?
मनी लॉंडरिंगप्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखरकडून जॅकलिनने कोट्यवधींच्या भेटवस्तू स्वीकारल्याचा आरोप तिच्यावर आहे. सुकेशची संपूर्ण माहिती जॅकलिनला होती, असे ईडीने आरोपपत्रात म्हंटले आहे. तसेच जॅकलिनच्या मॅनेजर प्रशांतकडून ८ लाखांची एक डुकाटी स्पोर्ट्स बाइक जप्त केली आहे. शिवाय ही मोटरसायकल सुकेशनेच प्रशांतला भेट म्हणून दिल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. या प्रकरणी अभिनेत्री नोराची चौकशी झाली होती. नोरालाही सुकेशने अशाच महागड्या भेटवस्तू देण्याचे कबूल केले होते, पण चौकशी दरम्यान आपण त्यापैकी कोणत्याही भेटवस्तू स्वीकारल्या नसल्याचं नोराने स्पष्ट केलं आहे.
सुकेशने लिहले पत्र :
सुकेश सध्या तुरंगात आहे. त्याने आपल्या वकिलाला पत्र लिहले आहे ज्यामध्ये त्याच म्हणणं आहे की जॅकलिनचा या प्रकरणात कोणताही संबंध नाही. अभिनेत्रीला मिळालेल्या सर्व भेटवस्तू आणि पैसे हे आमच्या नात्याचा भाग म्हणून होते. सुकेशचे फोटो सोशल मीडियावर व्हायरलदेखील झाले होते