कोरिओग्राफर आणि चित्रपट दिग्दर्शक रेमो डिसूझाने बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपटांमधील गाण्यांची कोरिओग्राफी केली आहे. यासह त्याने ‘एबीसीडी’ (एनीबडी कॅन डान्स) सारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केल्यामुळे तो लोकप्रिय आहे. त्याने नुकतेच प्रयागराज येथे आयोजित ‘महाकुंभमेळा २०२५ ला भेट दिली.

२६ जानेवारी २०२५ रोजी सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये, रेमो डिसूझा साध्या काळ्या कपड्यांमध्ये दिसत असून, त्याने अंगावर काळी शाल घेतली होती. याच शालीने त्याचा अर्धा चेहरा झाकला आहे असे व्हिडीओमध्ये दिसते. यामुळेच तो गर्दीत जाऊन गंगाघाट आणि आजूबाजूचा परिसर फिरून आला, या शालीमुळे त्याला कोणीच ओळखू शकले नाही. व्हिडीओमध्ये तो कुंभमेळ्याच्या गजबजलेल्या मैदानातून वाट काढत बोटीत बसून गंगेतल्या एका शांत जागी जाताना दिसत आहेत.

Saif Ali Khan House Help Video
हाताला पट्टी अन् कपड्यांवर रक्ताचे थेंब, सैफ अली खानबरोबर हल्ल्यात जखमी झालेल्या मदतनीसचा Video Viral
Mahakumbh 2025 Mamta Kulkarni Kinnar Akhada
Mahakumbh 2025: इंजिनीअर्स, डॉक्टर्स व तरुणांना किन्नर आखाड्याचे आकर्षण का?
Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
bollywood actors went to kareena home to meet her and kids
Video : सैफला भेटून बहिणीचे डोळे पाणावले! करण जोहर, रणबीरसह ‘हे’ बॉलीवूड कलाकार पोहोचले करीनाच्या भेटीला
Dhoom 4
रणबीर कपूरच्या ‘धूम ४’मध्ये खलनायक कोण असणार? दाक्षिणात्य अभिनेत्याची वर्णी लागण्याची शक्यता
kareena Kapoor video last night from recidence after the incident
Video: पतीवर झालेल्या हल्ल्याने करीना कपूर चिंतेत; घटनेनंतर घराबाहेरील पहिला व्हिडीओ आला समोर
kiliye kiliye new song
‘काय ती स्टाईल….काय तो स्वॅग…सगळंच एकदम भारी!’ चिमुकल्याचा डान्स पाहून नेटकऱ्यांना Jr. NTR आठवला…Viral Video बघाच
Police Suspects Saif Ali Khan House Helper knew Attacker
हल्लेखोराला ओळखत होती सैफ अली खानची मदतनीस, पोलिसांना संशय; दोन तासांच्या CCTV फुटेजमध्ये…

त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर, रेमोने गंगेच्या पवित्र पाण्यात स्नान केले. दुसऱ्या एका पोस्टमध्ये, तो आणि त्याची पत्नी स्वामी कैलाशानंद गिरी महाराज यांचे आशीर्वाद घेताना दिसत आहेत.

रेमोने हा व्हिडीओ कोणत्याही कॅप्शनशिवाय शेअर केला असून फक्त #harhargange आणि #mahakumbh2025 अशा हॅशटॅगचा वापर केला आहे. अभिनेता सुधांशू पांडेने रेमो डिसूझाच्या पोस्टवर कमेंट करत लिहिले, “क्या बात है.. हा आशीर्वाद तुमच्या अनेक पिढ्यांना हा एकत्र आशीर्वाद मिळाला.” अभिनेता निकितीन धीरने लिहिले, “हर हर महादेव.” कोरिओग्राफरच्या चाहत्यांनी त्यांच्या भक्तिभावाची प्रशंसा केली.

काही दिवसांपूर्वी रेमो डिसूझासह कपिल शर्मा, अभिनेता राजपाल यादव, यांना पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी देणारे इमेल आले होते. या पार्श्वभूमीवर रेमोने महाकुंभात स्नान केल्याने याची चर्चा होत आहे.

कामाच्या आघाडीवर, रेमो डिसूझा सध्या ‘इंडियाज बेस्ट डान्सर व्हर्सेस सुपर डान्सर: चॅम्पियन्स का तशन’ या रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून दिसत आहेत. या पॅनेलमध्ये मलायका अरोरा, गीता कपूर यांचा समावेश असून, हर्ष लिंबाचिया शोचे सूत्रसंचालन करत आहेत. हा लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शो दर शनिवारी आणि रविवारी रात्री ७ वाजता प्रसारित होतो.

Story img Loader