‘मिस इंडिया’, ‘मिस युनिव्हर्स’ असे मानांकित किताब भूषवणाऱ्या सुश्मिता सेनचा आज ४७ वा वाढदिवस आहे. १९९६ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या सुष्मिताच्या चित्रपटांपेक्षा तिच्या खासगी आयुष्याची जास्त चर्चा होते. तिने रेने आणि अलिसा या दोन मुलींना दत्तक घेतले होते. फार कमी वयामध्ये तिने हा निर्णय घेतला होता. सुष्मिताच्या वाढदिवसाचे निमित्त साधत तिच्या लेकीने, रेने सेनने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा लाईफलाईन.. आता तू तुझ्या आयुष्यातील सर्वात आनंददायी टप्प्यामध्ये प्रवेश करत असताना मला फक्त तुला धन्यवाद म्हणायचे आहे. तू खूप मोठ्या मनाची आहेस. यामुळेच तू लोकांना माफ करु शकतेस. तुझी मुलगी होणं हा देवाने देलेला सर्वात मोठा आशीर्वाद आहे. तुझं काम अतुलनीय आहे. मी स्वत:ला खूप भाग्यशाली समजते की त्याची साक्षीदार असते.”

“तुझ्या कामामध्ये प्रेम, समर्पण आणि मेहनत या गोष्टी दिसतात आणि परिसस्पर्शाने तू ज्याला हात लावेतस, ती गोष्ट सोनं बनते. तू अभिनयाची संस्था आहेस. तू इतकं प्रामाणिकपणे काम करतेस की ते पाहून मी तुझ्या अभिनयामध्ये तुझ्या अस्तित्वाचं प्रतिबिंब पाहते असं वाटतं. माझा सांभाळ करताना मला तुझ्यामधील कृतज्ञता, धैर्य आणि दयाळूपणाचा अनुभव मला आला. या भावनेने तू मला वाढवलंस. मला स्वत:ची ओळख मिळवून देण्यासाठी मदत केलीस. तू सोडून मला दुसऱ्या कोणाबरोबरही राहायचं नाहीये. तू म्हणजं घर असं आहे. तू जिकडे आहेस, तिकडे घर आहे”, असे तिने म्हटले.

आणखी वाचा – “मी गेल्या १३ वर्षांपासून…” सुश्मिता सेन लवकरच आयुष्याशी संबंधित घोषणा करणार, पोस्टमुळे चर्चांना उधाण

त्यापुढे ती म्हणाली, “शिखरावर असतानाही पाय जमिनीवर कसे ठेवावेत हे शिकवल्याबद्दल धन्यवाद. तुझ्या आयुष्यामध्ये तू घेतलेले निर्णय योग्य का होते हे मला मी जसजशी वयाने मोठी होत आहे, तसे कळत आहेत. शिस्त आणि सातत्याने स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक-एक पाऊल टाकणं किती महत्त्वाचं आहे हे दाखवून देण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला आणि अलिसाला स्वतःच्या अटींवर आयुष्य जगणं शिकवण्यासाठी खूप खूप धन्यवाद. शिखरावर असतानाही पाय जमिनीवर कसे ठेवावेत हे शिकवल्याबद्दल धन्यवाद.”

आणखी वाचा – Drishyam 2 Box Office Collection: ‘दृश्यम २’ ठरला ‘ब्रह्मास्त्र’नंतर पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट, जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

“तुझ्या आयुष्यामध्ये तू घेतलेले निर्णय योग्य का होते हे मला मी जसजशी वयाने मोठी होत आहे, तसे कळत आहेत. शिस्त आणि सातत्याने स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक-एक पाऊल टाकणं किती महत्त्वाचं आहे हे दाखवून देण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला आणि अलिसाला स्वतःच्या अटींवर आयुष्य जगणं शिकवण्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप प्रेम. वाढदिवसाच्या शुभेच्छा आई”, असेही रेने सेनने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rene sen has shared special post on mother sushmitas 47th birthday yps