मराठी आणि हिंदी मनोरंजन सृष्टीत गेली अनेक वर्ष आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे रेणुका शहाणे. त्या त्यांच्या कामाने नेहमीच सगळ्यांचे लक्ष वेधून घेत असतात. आता सध्या त्या त्यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. त्यांचे देशभरात लाखो चाहते असले तरीही आजही त्यांना नकारांचा सामना करावा लागत आहे, असा धक्कादायक खुलासा त्यांनी एका मुलाखतीत नुकताच केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटात त्यांनी विकी कौशलच्या आईची भूमिका साकारली आहे. ह्या चित्रपटात त्यांचा हटके अंदाज पाहायला मिळतोय. सध्या या चित्रपटाच्या निमित्ताने त्या अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत, अनेक मुलाखती देत आहेत. दरम्यान अशाच एका मुलाखतीत त्यांनी आजकाल चित्रपटासाठी होणाऱ्या कास्टिंगच्या प्रक्रियेबद्दल भाष्य केलं.

आणखी वाचा : स्वप्निल जोशी ‘तू तेव्हा तशी’ मालिकेच्या एका भागासाठी आकारतो ‘इतके’ मानधन, किंमत ऐकून व्हाल थक्क

‘प्रभात खबर’ला दिलेल्या एका मुलाखतीत त्या म्हणाल्या, “मला अनेकदा ऑडिशननंतर नकार मिळाला आहे. मला दिग्दर्शकाकडून त्या भूमिकेबद्दल जाणून घ्यायचं असतं. पण आजकाल हे काम त्यांचे असिस्टंट करतात. मला ही प्रक्रियाच समजत नाही आणि त्यामुळे मी ऑडिशन यशस्वीरित्या पार करू शकत नाही.”

हेही वाचा : ‘हम आपके है कौन…!’ चित्रपटतील रेणुका शहाणे यांचा ‘तो’ सीन शूट करताना ढसढसा रडल्या होत्या रीमा लागू

पुढे त्यांनी सांगितलं, “मला वाटतं मी ऑडिशनमध्ये माझं शंभर टक्के देऊ शकत नाही. पण मी ऑडिशनमध्ये मिळालेल्या नकाराला तितकं गांभीर्याने घेत नाही. तसंच मी एक वाईट अभिनेत्री आहे असंही मला वाटत नाही. मीही एक दिग्दर्शिका आहे आणि मला विविध प्रकारचे कलाकार मिळतात. पण ऑडिशनमधून नकारा मिळाला याचा अर्थ त्यांचा अभिनय चांगला नाही असं नाही, फक्त ते त्या भूमिकेच्या जवळ जाऊ शकत नाहीत.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Renuka shahane opens up about get rejected in auditions rnv