मराठमोळ्या अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी ९० च्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हम आपके है कौन’ या चित्रपटातील ‘पूजा चौधरी’ भूमिकेमुळे रेणुका शहाणेंना एक नवी ओळख मिळाली. त्यांनी २००१ मध्ये अभिनेते आशुतोष राणा यांच्याशी लग्न केले. या दाम्पत्याला दोन मुलं आहेत. अभिनेत्रीचा ‘हम आपके है कौन’ हा चित्रपट पाहिल्यावर त्यांच्या मुलांची काय प्रतिक्रिया होती याबाबत अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत रेणुका शहाणे यांनी खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “UPSC चा फॉर्म भरायला विसरले अन्…”, स्पृहा जोशीने सांगितला अभिनय क्षेत्रातील प्रवास; म्हणाली “बाबांकडून सहा महिने…”

‘बॉलीवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत रेणुका शहाणे म्हणाल्या, “मी माझ्या मुलांना दोघेही साधारण १० ते १२ वर्षांचे असताना ‘हम आपके है कौन’ हा चित्रपट दाखवला. त्यांच्यासाठी रेणुका शहाणे ही त्यांची आई होती. त्यामुळे तो चित्रपट त्यांनी कधीच पाहिला नव्हता. मी अभिनेत्री आहे याचीही त्यांना कल्पना नव्हती.”

हेही वाचा : “मुख्यमंत्री व्हायची संधी मिळाली तर?”, प्रिया बापट प्रश्नाला उत्तर देत म्हणाली, “सर्वात आधी मुंबईचे…”

रेणुका शहाणे यांनी पुढे सांगितले, “जेव्हा माझी मुलं साधारण १० ते १२ वर्षांची झाली, तेव्हा त्यांना शाळेतील मित्रमंडळी, इतर काही पालकांमुळे मी ‘हम आपके है कौन’ चित्रपटात काम केले आहे हे कळाले. एके दिवशी दोघेही घरी आले आणि त्यांनी मला आम्हाला पूर्ण चित्रपट पाहायचा आहे असे सांगितले. चित्रपटातील माझ्या मृत्यूचा प्रसंग पाहून माझा मोठा मुलगा फार अस्वस्थ झाला. त्याला दिग्दर्शक सूरजजींचा खूप राग आला होता. तो संतापून म्हणाला, ‘मी त्यांना कधी पाहिले तर…’ एकंदर त्या चित्रपटातील मृत्यूच्या सीनमुळे त्याच्यावर वाईट परिणाम झाला होता.”

हेही वाचा : लग्न न करताच इलियाना डिक्रुझ झाली आई, गोंडस बाळाचा पहिला फोटो आला समोर, नावही आहे खास

दरम्यान, विजय केंकरे यांच्याशी घटस्फोट झाल्यावर रेणुका शहाणे यांनी आशुतोष राणा यांच्याबरोबर लग्न केले. या दाम्पत्याला शौर्यमान आणि सत्येंद्र अशी दोन मुले आहेत. ‘हम आपके है कौन’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सूरज बडजात्या यांनी केले होते. यामध्ये रेणुका शहाणे यांच्यासह सलमान खान, माधुरी दीक्षित, मोहनीश बहल, अनुपम खेर, रीमा लागू, आलोक नाथ, बिंदू, अजित वाचानी आणि हिमानी शिवपुरी या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Renuka shahane says her son was disturbed after watching hum aapke hain koun sva 00