‘हम आपके है कौन’ मध्ये माधुरी दीक्षितच्या मोठ्या बहिणीची भूमिका साकारून रेणुका शहाणे (Renuka Shahane) यांना खूप लोकप्रियता मिळाली. त्यांनी करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे केले आहेत. आता त्यांनी एका मुलाखतीत मासिक पाळीबद्दल सांगितलं. त्यांना १० वर्षांच्या असताना मासिक पाळी आली होती. लवकर मासिक पाळी येणे आणि शारीरिक बदलांचा नंतरच्या आयुष्यावर कसा परिणाम होतो, याबाबत त्यांनी सांगितलं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
१० वर्षांची असताना मासिक पाळी आली – रेणुका शहाणे
‘वी आर युवा’ पॉडकास्टमध्ये रेणुका म्हणाल्या, “मी १० वर्षांची असताना मासिक पाळी आली. मी आता ५८ वर्षांची आहे आणि मी माझं बहुतांशी आयुष्य पाळीसोबत जगले. शारीरिकदृष्ट्या मी माझे बालपण फार कमी काळ एंजॉय केलं. इतक्या कमी वयात तुमच्या शरीरात काय होत आहे हे समजून घेण्याइतका तुमच्या मेंदूचा विकास झालेला नसतो. मी नशीबवान होते की मला आईने या सगळ्या गोष्टी नीट समजावून सांगितल्या. माझ्या घरी या सगळ्यावर अगदी मोकळेपणाने चर्चा व्हायची. पण, काय होत आहे आणि का होत आहे हे मला तेव्हा फारसं समजत नव्हतं. हे वाईट नाही आणि याचा मला त्रास होत नाही एवढंच मला कळायचं.”
त्या काळात मला खूप एकटं वाटायचं – रेणुका शहाणे
त्या पुढे म्हणाल्या, “त्या वयात माझ्या शाळेत कुणालाही मासिक पाळी आली नव्हती, माझ्या वर्गातही नाही. माझ्या मैत्रिणींपैकी कुणालाही तेव्हा पाळी येत नव्हती, त्यामुळे या गोष्टी शेअर करण्यासाठी मैत्रिणींना मासिक पाळी येईपर्यंत मला वाट पाहावी लागली. त्यांना माझ्यानंतर तीन वर्षांनी पाळी आली. त्या काळात मला खूप एकटं वाटायचं. सुदैवाने, मी माझ्या आईशी याबद्दल बोलू शकत होते, पण याचा तुमच्यावर मानसिकदृष्ट्याही प्रभाव पडतो की तुम्ही अशा प्रकारे मोठे होत आहात ज्याबद्दल कोणालाच माहित नाही. शाळेतही याबद्दल कोणीही बोलत नाही.”
मासिक पाळीबद्दल चर्चा न होण्याचा काय परिणाम झाला, याबद्दल रेणुका शहाणे यांनी सांगितलं. “माझ्या वयाच्या कोणत्याही मुलीशी मी पाळीबद्दल बोलू शकत नव्हते. त्यामुळे माझ्या शरीराची वाढ होत आहे हे मी लपवायला पाहिजे, असं मला वाटू लागलं आणि ही भावना कायम माझ्याबरोबर राहिली. माझा माझ्या शरीराकडे पाहण्याचा दृष्टीकोन किंवा पेहरावाच्या पद्धतीबद्दल मी खूप जुन्या विचारांची आहे. या गोष्टींचे मूळ माझे बालपण आहे. पण या गोष्टीचा कोणीही विचार करत नाही,” असं रेणुका शहाणे म्हणाल्या.
रेणुका शहाणे या सॅनिटरी नॅपकिनच्या जाहिरातीमध्ये दिसणाऱ्या पहिल्या अभिनेत्री होय. जवळच्या लोकांचा विरोध पत्करून त्यांनी ही जाहिरात केली होती. रेणुका यांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास त्या २०२२ मध्ये ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटात दिसल्या होत्या. यात विकी कौशल, भूमी पेडणेकर आणि कियारा अडवाणी होते.