अभिनेत्री विद्या बालनने आजवर बॉलीवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. तिच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. विद्याच्या सौंदर्याचेही सगळेच जण तोंडभरून कौतुक करतात. विद्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. लोक जेवढे तिच्या बोल्डनेसच्या प्रेमात आहेत तितकेच तिच्या पारंपरिक लूकचेही वेडे आहेत. मात्र, अनेकदा विद्याला तिच्या वजनावरून ट्रोल करण्यात आलं आहे. असंच एकदा एका पत्रकाराने वजन कमी करण्याबाबत विद्या बालनला सल्ला दिला होता.

हेही वाचा- ” गेल्या वर्षापासून मी…”; मुलीचे भगव्या बिकिनीतील फोटो व्हायरल झाल्यानंतर विवेक अग्निहोत्रींची झाली होती ‘अशी’ अवस्था

Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
prajakta mali marathi actress reveals her weight
प्राजक्ता माळीचं वजन किती? भलंमोठं कॅप्शन लिहित केला खुलासा; म्हणाली, “लोक म्हणू लागलेत एवढी बारीक…”
Marathi actor Kushal Badrike funny post and share photos with wife
“आमचा संसार चालत नाही, तो…”, कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…
Himanshi Khurana's Weight Loss Secret
दररोज पराठा खाणाऱ्या हिमांशी खुरानाने केले ११ किलो वजन कमी? जाणून घ्या, तज्ज्ञ याविषयी काय सांगतात?
Actress Deepti Sadhwani weight loss journey
‘तारक मेहता…’ फेम अभिनेत्रीने फक्त ‘इतक्या’ महिन्यांत घटवलं १७ किलो वजन; चाहत्यांना सांगितला डाएट अन् वर्कआउट प्लॅन

‘हम पांच’ या टीव्ही शोमधून करिअरची सुरुवात करणाऱ्या विद्या बालनला तिच्या वजनामुळे अनेकदा ट्रोलिंगला बळी पडावं लागलं आहे. मात्र, विद्याच्या म्हणण्यानुसार, तिच्या वजनामुळे तिला तिच्या कामात कोणताही अडथळा जाणवत नाही. मात्र असं असतानाही अनेक जण तिच्यावर टीका करतात. २०१७ मध्ये तिचा ‘तुम्हारी सुलू’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर विद्या बालनच्या एका कॉन्फरन्समध्ये एका रिपोर्टरने तिला ग्लॅमरस भूमिका साकारण्यासाठी वजन कमी करण्याचा सल्ला दिला होता. या सल्ल्यानंतर विद्याने रिपोर्टरला सडेतोड उत्तर दिलं होतं.

हेही वाचा- “आमची बदनामी…”, मनोज वाजपेयीच्या चित्रपटाला आसाराम बापू ट्रस्टनं पाठवली नोटीस

विद्या बालनने पत्रकाराला प्रत्युत्तर देताना सांगितलं की, मी जे काही करत आहे त्यामुळे मी खूप आनंदी आहे, तुम्ही तुमची धारणा बदलू शकलात तर खूप छान होईल. विद्याला तिच्या वजनावरून उघडपणे लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ होती. मात्र, त्यानंतरही अनेकदा विद्याला वजनावरून ट्रोल करण्यात आलं आहे. आपल्या वजनामुळे ट्रोल झाल्याबद्दल विद्याने एका मुलाखतीत सांगितलं आहे. विद्या म्हणाली, “जेव्हा मी १७ वर्षांची होते, तेव्हा मला कोणीतरी सांगितलं होतं की, जर मी दिवसातून १० लिटर पाणी प्यायले तर माझं वजन कमी होईल. त्यानंतर मी रोज १० लिटर पाणी पिऊ लागले. पण जास्त पाणी प्यायल्याने जवळपास रोज रात्री मला उलटी व्हायची.”

हेही वाचा- विवेक अग्निहोत्री यांची पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना कायदेशीर नोटीस; दिग्दर्शक ट्वीट करीत म्हणाले…

विद्या बालनने सिद्धार्थ रॉय कपूरसोबत लग्न केलं. आता त्यांच्या लग्नाला अकरा वर्षं झाली आहेत आणि लग्नाच्या ११ वर्षांनंतर आता त्यांना एक प्रश्न वारंवार विचारला जातो की, विद्या आई कधी होणार? यावर विद्या म्हणाली की, सध्या मातृत्वासाठी तिची मानसिकदृष्ट्या तयारी झालेली नाही. कारण लहान बाळाची जबाबदारी घेणं अवघड काम आहे.

Story img Loader