हृतिक रोशन व दीपिका पदुकोण यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘फायटर’ चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. चित्रपटाने आजवर ३५० कोटींहून अधिक कमाई केली आहे. यातील काही बोल्ड सीन्समुळे या चित्रपटावर बऱ्याच लोकांनी आक्षेप घेतला तर काही सैन्यातील अधिकाऱ्यांनी याविरोधात कारवाई करण्यासाठीही विनंती केली. परंतु चित्रपटाचं कौतुकही ऐकायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकतंच निवृत्त मेजर जनरल जीडी बक्षी यांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे आणि आपल्या भावना त्यांनी सोशल मीडिया अकाऊंटद्वारे व्यक्त केल्या आहेत. चित्रपटातील मुख्य अभिनेता हृतिक रोशन यानेही यावर त्याची प्रतिक्रिया दिली आहे. बालाकोट वायु हल्ल्यावर बेतलेल्या या चित्रपटाच्या माध्यमातून वायुसेनेतील शहीद झालेल्या पायलट यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. हा चित्रपट पाहून जीडी बक्षी यांनी हृतिक रोशनला टॅग करत याचं कौतुक केलं आहे.

आणखी वाचा : चित्रपटसृष्टीतील बड्या सेलिब्रिटीजच्या गर्दीत हरवलेला पण आपल्या कलेतून प्रेक्षकांना समृद्ध करणारा अवलिया ‘कपूर’

जीडी बक्षी आपल्या ट्विटर हॅंडलवर लिहितात, “नुकताच फायटर हा चित्रपट पाहून आलो आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या वायुसेनेतील योद्ध्यांना अत्यंत अद्भुत आणि समर्पक अशी श्रद्धांजली दिली आहे. सूखोईमधलं थरारनाट्य आणि शत्रूला उत्तर देण्यासाठी भारतीय वायूसेनेने दाखवलेले साहस फारच उत्तमरित्या सादर करण्यात आलं आहे. एयर कॉम्बॅट सिक्वेन्स तर अजिबात चुकवू नका. हृतिक रोशननेसुद्धा उत्कृष्ट पायलटची भूमिका निभावली आहे. हृतिकने टॉम क्रुजला चांगलीच टक्कर दिली आहे. हा चित्रपट सगळ्यांनी अवश्य बघा.”

जीडी बक्षी यांच्या या पोस्टवर हृतिक रोशननेही प्रतिक्रिया दिली आहे. हृतिक म्हणाला, “सर तुमच्याकडून अशाप्रकारची प्रतिक्रिया येणं हा माझ्यासाठी एक खूप मोठा सन्मान आहे. तुमचे खूप खूप आभार.” केवळ जीडी बक्षीच नव्हे तर भारतीय वायूसेनेच्या सर्वच अधिकाऱ्यांनी हा चित्रपट पाहून याचे कौतुक केले आहे. ‘फायटर’मध्ये हृतिक रोशन, दीपिका पदूकोण, अनिल कपूर हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Retired major general gd bakshi reaction on hrithik roshan starrer fighter film avn