सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाशी संबंधित ड्रग्स प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यानंतर आता आणखी एका प्रकरणात रिया चक्रवर्तीचं नाव असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात रियासह लोकप्रिय कॉमेडियन भारती सिंग आणि ‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता, लोकप्रिय युट्यूबर एल्विश यादवचं देखील नाव सामील आहे. या प्रकरणात अनेक युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुअन्सरची नाव असून दिल्ली पोलिसांनी चौकशासाठी यांना समन्स बजावला आहे.

रिया चक्रवर्ती, भारती सिंग आणि एल्विश यादव यांच्यावर ५०० कोटी रुपयांच्या हायबॉक्स ( HIBOX ) मोबाइल अ‍ॅपसंबंधित घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांना ५००हून अधिक तक्रारी आल्या होत्या. या तक्रारदारांनी आवडत्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा आणि युट्यूबरचा व्हिडीओ पाहिल्यांनंतर संबंधित मोबाइल अ‍ॅपमध्ये गुंतवणूक केली होती. यामुळे ३० हजार लोकांची फसवणूक केल्याचा आरोप रिया, भारती आणि एल्विशसह काही इन्फ्लुएन्सर आणि युट्यूबवर दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतील अभिनेत्रीने खरेदी केली आलिशान गाडी, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

५०० कोटी रुपयांच्या हायबॉक्स मोबाइल अ‍ॅपच्या घोटाळ्यात रिया, भारती आणि एल्विशसह सौरव जोशी, हर्ष लिंबाचिया, अभिषेक मल्हान, दिलराज सिंह रावत, पूरव झा, लक्ष्य चौधरी, आदर्श सिंह आणि अमितसारखे युट्यूबर्सची नाव सामिल आहेत.

हेही वाचा – Bigg Boss 18 : ‘बिग बॉस’च्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं, शोच्या पहिल्याच दिवशी टॉप-२ फायनलिस्टचा केला खुलासा, कोण आहेत? जाणून घ्या…

‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना पोलीस आयुक्त हेमंत तिवारी म्हणाले, “हायबॉक्स एक मोबाइल अ‍ॅप्लिकेशन आहे, जे एका प्लॅनसह केलेला घोटाळ्याचा भाग आहे. आरोपींनी दररोज एक ते पाच टक्के आणि महिन्याला ३० ते ९० टक्के पैसे परत मिळण्याचे आश्वासन दिले होते. याप्रकरणातील मुख्य आरोपी शिवराम (वय ३०), जो चेन्नईत राहणार आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.”

हेही वाचा – “हे खूप प्रेम, हसणं आणि…”, प्रिया बापटने लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने लिहिली खास पोस्ट, म्हणाली…

दरम्यान या प्रकरणानंतर इजीबझ आणि फोनपे या दोन पेमेंट अ‍ॅपची देखील चौकशी करत आहेत. कारण या अ‍ॅप्सनी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे पालन केलेले नाही, असं पोलिसांनी एका निवेदनातून सांगितलं आहे.

Story img Loader