बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात पुन्हा नवीन उलगडा झाला आहे. सुशांतने आत्महत्या केली नसून त्याच्या खून झाल्याचा दावा एका व्यक्तीने केला आहे. कूपर रुग्णालयात सुशांतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणाऱ्या अधिकाऱ्याचं सुशांतची हत्या झाल्याचं म्हणणं आहे.

कूपर हॉस्पिटलमध्ये सुशांत सिंह राजपूतचे पोस्टमॉर्टम करणारे रूपकुमार शाह यांनी हा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. त्यानंतर आता सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने एक पोस्ट शेअर केली आहे. रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक स्टोरी शेअर केली आहे. “अग्नीतून पुढे गेला, वादळातून स्वत:ला वाचवलं, वाईटावर विजय मिळवला, जेव्हा पुढच्या वेळी स्वत:च्या सामर्थ्यावर संशय घेशील तेव्हा याचा विचार करा”, असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा>> २३ वर्षीय सोशल मीडिया स्टारची आत्महत्या, घराच्या गच्चीवरच घेतला गळफास

rhea chakraboty

सुशांत सिंह राजपूत व रिया चक्रवर्ती रिलेशनशिपमध्ये होते. सुशांतच्या आत्महत्येसाठी त्याच्या कुटुंबियांनी रियाला दोषी ठरवलं होतं. तिच्यामुळेच सुशांतने आत्महत्या केल्याचं त्यांचं म्हणणं होतं. या प्रकरणात रियाची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती. तिला तुरुंगातही ठेवण्यात आलं होतं.

हेही वाचा>> अभिनेता सुशांत सिंग राजपूतविषयी खूप कमी लोकांना माहिती असणाऱ्या ‘या’ ९ खास गोष्टी

सुशांत सिंह राजपूतच्या हत्येचा नेमका दावा काय?

कूपर हॉस्पिटलमध्ये सुशांत सिंग राजपूतचे पोस्टमॉर्टम करणारे रूपकुमार शाह यांनी त्याची हत्या झाल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले, “सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला तेव्हा आमच्याकडे ५ ते ६ मृतदेह शवविच्छेदनासाठी आले होते. त्यामध्ये एक आत्महत्या केलेला व्हीआयपी मृतदेह आला होता. जेव्हा तो मृतहेद शवविच्छेदन करण्यासाठी टेबलवर घेतला तेव्हा, तो सुशांतसिंह राजपूतचा असल्याचं कळलं. सुशांतच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आणि गळ्यावर दोन व्रण होते, हातापायवर मार लागून तुटल्यासारख्या खुणा होत्या. त्याची व्हिडीओ शूटींग करायला हवी होती, असं आमचं म्हणणं होतं. पण अधिकाऱ्यांनी फक्त फोटो काढायला सांगितलं. आम्ही आमच्या वरिष्ठांना सांगितलं की, ही हत्याच वाटत आहे. त्यापद्धतीने त्यावर काम करावं, पण वरिष्ठ म्हणाले तत्काळ शवविच्छेदन करुन मृतदेह द्यायचा आहे,” असा दावा शाह यांनी केला आहे.

Story img Loader