अभिनेत्री रिया चक्रवर्ती ही तिचा बॉयफ्रेंड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर खूपच चर्चेत आली. त्यानंतरच्या काळात तिला बऱ्याच कठीण प्रसंगाचा सामना करावा लागला होता. २०२० मध्ये सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर तिला सुमारे २८ दिवस भायखळा तुरुंगात राहावे लागले होते. रिया तुरुंगात असताना तिचे तेथील आयुष्य कसे होते याबद्दल आता अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : करणवीर बोहराने पूनम पांडेशी केलेल्या ‘त्या’ कृतीमुळे नेटकरी नाराज; म्हणाले, “घरी गेल्यावर बायको…”

मानवाधिकार वकील आणि कामगार संघटना या क्षेत्रात कार्यरत असलेल्या सुधा भारद्वाज यांनी तुरुंगात रियाचे आयुष्य कसे होते याबद्दल भाष्य केले आहे. तिला स्पेशल सेलमध्ये ठेवले होते. रिया चक्रवर्तीने तुरुंगात कैद्यांशी सुसंवाद साधला, असे त्यांनी सांगितले.

सुधा भारद्वाज एका वृत्त वाहिनीशी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या, “रियाची इतर कैद्यांबरोबर चांगली वागणूक होती. त्यांनाही रिया खूप आवडायची. यामुळे जेव्हा रिया चक्रवर्तीची सुटका होणार होती तेव्हा सर्व कैदी तिला गेटपर्यंत सोडायला आले आणि मग रिया चक्रवर्तीकडे जे काही पैसे शिल्लक होते त्यातून तिने मिठाई विकत घेऊन ती कैद्यांना वाटली. त्यासोबतच तिने कैद्यांबरोबर नाचही केला.”

सुधा भारद्वाज पुढे म्हणाल्या, “एखाद्या तरुणाला अशा परिस्थितीत टाकल्याने तो खूप अस्वस्थ होतो. पण रियाने धीर सोडला नाही. तिला स्पेशल सेलमध्ये ठेवण्यात आले होते. तुरुंगातील इतर कैद्यांशी आणि लोकांशी तिची मैत्री होती. ती सर्वांशी प्रेमाने वागायची. लहान मुलांबरोबरही तिची छान मैत्री झाली होती. पहिल्या दिवशी प्रत्येकजण विचारत होता की, रिया कुठे आहे? लोक कसे आहेत हे तुम्हाला माहिती आहे. पण रियाने कधीच याची वाच्यता केली नाही आणि कधीच करणारही नाही. उलट ती तेथून परतत असताना तिच्या खात्यात जे काही पैसे शिल्लक होते, त्याच्यातून तिने सर्वांना मिठाई वाटली. सर्व कैदी तिला निरोप देण्यासाठी गेटवर आले होते. ती जात असताना सगळे म्हणू लागले, “रिया डान्स, रिया डान्स.” रियाने त्यांच्या या मागणीला खरंच होकार दिला आणि ती कैद्यांबरोबर नाचली.”

आणखी वाचा : Sushant Singh Rajput Drugs Case : रिया चक्रवर्तीच्या अडचणीत पुन्हा वाढ, NCB कडून खटला दाखल

सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर तपासात समोर आलेल्या ड्रग्स प्रकरणात रिया चक्रवर्तीला सप्टेंबर २०२० रोजी अटक करण्यात आली होती. जवळपास १ महिना तुरुंगात राहिल्यानंतर रियाचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयानं मान्य केला होता. सुशांत सिंह राजपूतने १४ जून २०२० रोजी मुंबईतील राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rhea chakraborty danced with jail inmates on last day rnv