Rhea Chakraborty Viral Video : बॉलीवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतनंतर व्यावसायिक निखिल कामथला डेट करत असल्याचं समोर आलं आहे. रिया व निखिलचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. त्यामुळेच दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे. पण रिया व निखिलचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले असून अभिनेत्रीला ट्रोल केलं जात आहे.

रिया चक्रवर्ती ( Rhea Chakraborty ) व निखिल कामथचा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’च्या पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत, रिया निखिलच्या बाईकवर मागे बसून फिरताना दिसत आहे. रियाने चेहऱ्यावर मास्क लावला असून निखिलने हेल्मेट घातलं आहे. दोघांच्या या व्हिडीओने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. “सुशांत सिंह राजपूतच्या पैशांवर मज्जा करते”, “आता पुढचा नंबर याचा”, “आता आणखी एक आत्महत्या होण्याची शक्यता”, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. तसंच रियाच्या डोक्यावर हेल्मेट नसल्यामुळेही नेटकऱ्यांनी खडसावलं आहे.

Manu Bhaker's Father Statement on His Daughter and Neeraj Chopra Marriage Rumors
Manu Bhaker Neeraj Chopra: मनू भाकेर-नीरज चोप्राची सोयरीक जुळली? मनूच्या वडिलांनी केले मोठे वक्तव्य; म्हणाले, “नीरजला आम्ही…”
11th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
११ सप्टेंबर पंचांग : प्रीती योग कोणाच्या नशिबाचे उघडणार कुलूप? व्यवसायात लाभ तर मान-सन्मानात होईल वाढ; वाचा तुमचे भविष्य
geeta phogat husband pawan saroha criticizes vinesh phogat
Vinesh Phogat : ‘देव तुला सद्बुद्धी देवो…’, मेहुणा पवन सरोहा विनेशवर का संतापला? तर बहीण गीता म्हणाली, ‘कर्माचीच फळं…’
Actress Tanushree Dutta Allegation on vivek Agnihotri
Tanushree Dutta : तनुश्री दत्ताचा विवेक अग्निहोत्रीवर गंभीर आरोप, “त्याने शॉर्ट स्कर्टमध्ये मला…”
Vasai, bhayandar railway station suicide, father and son suicide, Jai Mehta, dual marriage, Bhayandar railway station, southern girl
वसई : पिता पुत्राचे रेल्वे रूळावरील आत्महत्येचे गूढ उकलले; मुलाचे प्रेमसंबंध उघड
Female Doctor Suicide
Doctor Suicide : “डिअर अहो, बाय! मी मेल्यावर…” सात पानी पत्र लिहून डॉक्टर महिलेची आत्महत्या, पतीच्या छळाला कंटाळून उचललं पाऊल
passengers had to be pulled out of water along with their bags and belongings at pune railway station
पुणे रेल्वे स्थानक ‘पाण्यात’! बॅग, सामानासह पाण्यातून वाट काढण्याची प्रवाशांवर वेळ
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?

हेही वाचा – Video: “अत्याचाराच्या रक्ताचा टीळा माथ्यावर लावून…”, कोलकाता डॉक्टर बलात्कार प्रकरणावर प्रथमेश परबच्या पत्नीने कविवेतून मांडलं परखड मत

एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “जिथे पैसे तिथे ही.” दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “नवीन बकरा मिळाला.” तर तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, निखिल कामथ तू कोणाला डेट करतोय? चौथ्या नेटकऱ्याने लिहिलं, “आता याची वेळ येणार.”

दरम्यान, २०२०मध्ये सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर रियाला ( Rhea Chakraborty ) मीडिया ट्रायलचा सामना करावा लागला होता. तिला सप्टेंबर २०२०मध्ये सुशांतच्या मृत्यू प्रकरणाशी संबंधित ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आलं होतं. ऑक्टोबर २०२०मध्ये रियाला जामीन मिळाला. या वर्षाच्या सुरुवातीला, मार्चमध्ये, एनडीपीएस कायद्यांतर्गत नियुक्त केलेल्या मुंबईतील विशेष न्यायालयाने रियाला तिच्या कुटुंबासह परदेशात थायलंडला जाण्यासाठी परवानगी दिली.

हेही वाचा – Tanushree Dutta : तनुश्री दत्ताचा विवेक अग्निहोत्रीवर गंभीर आरोप, “त्याने शॉर्ट स्कर्टमध्ये मला…”

निखिल कामथ कोण आहे?

रिया चक्रवर्तीला डेट करत असलेला निखिल कामथ एक व्यावसायिक आहे. ९००० कोटींहून अधिक त्याची संपत्ती असून भारतातील सर्वात कमी वयातील करोडपतींपैकी निखिल एक आहे. २०१९मध्ये निखिलने अमांडा पूर्वांकराबरोबर लग्न केलं होतं. पण हे लग्न काही काळचं टिकलं. २०२१मध्ये दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. आता निखिलचं नाव रियाबरोबर ( Rhea Chakraborty ) जोडलं जात आहे.