Ira Khan Wedding Reception: सध्या आमिर खानच्या लेकीच्या लग्नाची ग्रँड रिसेप्शन पार्टीची चर्चा रंगली आहे. काल, १३ जानेवारीला आयरा खान व नुपूर शिखरेच्या लग्नाची ग्रँड रिसेप्शन पार्टी पार पडली. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरच्या बॉलरूममध्ये ही रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात आली होती. या रिसेप्शन पार्टीला बॉलीवूड सेलिब्रिटींसह राजकीय नेतेमंडळी उपस्थित राहिले होते. सध्या यासंबंधीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे; ज्यामध्ये अभिनेत्री पापाराझींच्या एका कृतीमुळे भडकलेली दिसली.
अभिनेत्री रिया चक्रवर्तीने काल आयरा-नुपूच्या रिसेप्शन पार्टीत भावाबरोबर हजेरी लावली होती. याचा व्हिडीओ ‘इन्स्टंट बॉलीवूड’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत, रिया लिंबू रंगाच्या साडीत दिसत आहे. तर तिच्या भावाने काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. जेव्हा दोघं पापाराझींना फोटोसाठी पोझ देत होते तेव्हा एक पापाराझी ‘खूप छान जोडी’ असं म्हणाला. हे ऐकून इतर पापाराझी म्हणाले, ‘अरे तो भाऊ आहे. जोडी काय बनवतोस?’ हेच ऐकून रिया भडकली. अभिनेत्री पोझ देत पापाराझींना म्हणाली, “अशा लोकांमुळेच अफवा पसरते.”
हेही वाचा – Video: किली पॉलने ‘बॉइज ४’ चित्रपटातील ‘या’ गाण्यावर केली रील; अवधूत गुप्ते, गौरव मोरे पाहून म्हणाले…
रिया चक्रवर्ती हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अनेक नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहून रियाला सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून ट्रोल केलं आहे. या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने लिहिल आहे, ‘सुशांत सिंह राजपूतला धोका देणारी हीच आहे ना.’ तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिल आहे, ‘सुशांत सिंह राजपूतला न्याय मिळाला पाहिजे.’ तसेच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिल आहे, ‘हिच्यामुळे आज सुशांत सिंह राजपूत आपल्यामध्ये नाही.’ अशा अनेक प्रतिक्रिया रिया चक्रवर्तीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.