अभिनेत्री रिया चक्रवर्ती सध्या ‘रोडीज’मध्ये गँग लीडर म्हणून दिसत आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर तिने तीन वर्षांनी या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून पुनरागमन केलं. रिया सुशांतची गर्लफ्रेंड होती. सुशांतच्या आत्महत्येनंतर रियावर अनेक गंभीर आरोप झाले. तिला ट्रोलिंग व मीडिया ट्रायलला सामोरं जावं लागलं. प्रकरणाची चौकशी सुरू असताना तिचे व सुशांतचे व्हॉट्सअॅप चॅट्स लीक झाले होते, त्याबद्दल आता रियाने भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“त्याने त्याचा जीव का घेतला हे…”, रिया चक्रवर्तीचे सुशांतच्या मृत्यूवर भाष्य; म्हणाली, “मला काळी जादू…”

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाची चौकशी सुरू असताना रियाचे सुशांतबरोबरचे तसेच चित्रपट निर्माते महेश भट्ट आणि इतर काही चॅट्स लीक झाले होते. याबाबत रियाने मौन सोडलं आहे. सुशांतबरोबरच्या लीक झालेल्या व्हॉट्सअॅप चॅटबद्दल बोलताना रिया म्हणाली, “गोपनियता हा नियम पाहिजे, पर्याय नाही. कोणीतरी आपल्या आयुष्यात डोकावतंय हे कुणालाच आवडणार नाही. एखादी व्यक्ती दहशतवादी नसेल किंवा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न नसेल तर सर्वांना खासगी आयुष्य जगण्याचा हक्क आहे. आपलं आयुष्य किती खासगी ठेवायचं किती सार्वजनिक करायचं, याचा हक्क प्रत्येकाला आहे.”

Video: गुरमीत चौधरीने भर रस्त्यात पडलेल्या व्यक्तीचा वाचवला जीव, अभिनेत्याची कृती पाहून तुम्हीही कराल कौतुक

पुढे रिया म्हणाली, “तुम्ही तुमच्या पत्नीबरोबर आहात आणि तुमच्या बेडरूममध्ये कॅमेरा बसवला असेल तर तुम्हाला कसे वाटेल. अर्थात चांगलं वाटणार नाही. मलाही आवडलं नव्हतंच की कुणीतरी माझ्या खासगी चॅट्स वाचतंय. मग ते मेसेजेस मी माझ्या पार्टनरला केलेले असोत, मित्रांना केलेले असोत व माझ्या कुटुंबाला केलेले असोत.”

यावेळी रियाने मुलींना एक सल्लाही दिला. “मी सर्व मुलींना सांगू इच्छिते की तुम्हाला हवे ते कपडे घाला, तुम्हाला हवं तसं जगा. तुम्ही कसं बसायचं, काय करायचं कसं हे कुठलाच मुलगा तुम्हाला सांगणार नाही. समाज काय म्हणेल याचा विचार करू नका,” असं ती म्हणाली. मी एक सामान्य मुलगी होते, जिने लग्नाची आणि मुलांची स्वप्न पाहिली होती, पण २०२० मध्ये जे घडलं त्यानंतर आता आयुष्यात पुढे काय होईल हे आपल्याला माहीत नाही, असं रियाने ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह २०२३’ मध्ये सांगितलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rhea chakraborty on private chats leaked with sushant singh rajput hrc