दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा आज वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त कुटुंबीय, त्याचे मित्र आणि चाहते त्याच्या आठवणींना उजाळा देत त्याला शुभेच्छा देत आहेत. अशातच सुशांतची गर्लफ्रेंड राहिलेली रिया चक्रवर्ती हिनेदेखील सुशांतबरोबरचे फोटो शेअर केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

५ कोटी मानधन घेणाऱ्या सुशांतसिंहने ‘या’ चित्रपटासाठी घेतलेले फक्त २१ रुपये, वाचा संपूर्ण किस्सा

रियाने सुशांतबरोबरचे दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत दोन कप आहेत आणि त्यामागे सुशांत व रिया पोज देताना दिसत आहेत. तर, दुसरा फोटो हा सेल्फी आहे. रियाने काढलेल्या सेल्फीमध्ये सुशांत बघतोय. यात रियाने ब्लॅक फ्लोरल ड्रेस घातला आहे, तर सुशांत काळ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये दिसतोय. रियाने ‘♾️ +1’ असं कॅप्शन दिलंय. तसेच तिने काळ्या रंगाचा हार्ट इमोजीही वापरला आहे. रियाने वापरलेल्या त्या चिन्हाचा अर्थ ‘अनंत’ असा होतो. किती वर्षे झाली तरी तू अनंत राहशील, असा रियाच्या कॅप्शनचा अर्थ होतो.

जेव्हा सुशांत सिंह राजपूतने करण जोहरला मारली होती मिठी, निर्मात्याने दिली होती ‘अशी’ प्रतिक्रिया

रियाच्या या फोटोवर चाहते कमेंट्स करत आहेत. शिबानी दांडेकरसह अनेकांनी या फोटोवर रेड हार्ट इमोजी कमेंट केले आहेत. तसेच सुशांत तू कायम स्मरणात राहशील, अशा कमेंट्स काही जणांनी केल्या आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rhea chakraborty post on sushant singh rajput birth anniversary call him infinity hrc