Rhea Chakraborty : दिवंगत बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीचं नाव खूप चर्चेत आलं. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाशी संबंधित ड्रग्स प्रकरणात रियावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले. याप्रकरणी तिला सप्टेंबर २०२०मध्ये अटक करण्यात आली होती. २८ दिवसांनंतर रियाला ऑक्टोबर २०२०मध्ये जामीन मिळाला होता.

रियाबरोबर तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीला देखील जेलची हवा मिळाली होती. या वर्षाच्या सुरुवातीला, मार्चमध्ये एनडीपीएस कायद्यांतर्गत नियुक्त केलेल्या मुंबईतील विशेष न्यायालयाने रियाला तिच्या कुटुंबासह परदेशात थायलंडला जाण्यासाठी परवानगी दिली. पण अभिनेत्री जेलमध्ये असताना तिचे आई-वडील या काळात कसे सामोर गेले? याविषयी रियाने नुकत्याच एका मुलाखतीमधून खुलासा केला आहे.

Walmik Karad Mother Parubai Karad
Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर आईची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “आता मी मेल्यावर पाणी पाजायला…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
ram kapoor praised rakhi sawant
ती मुंबईत 3 BHK सी फेसिंग बंगल्यात राहते; राखी सावंतबद्दल अभिनेत्याचं वक्तव्य; म्हणाला, “इंडस्ट्रीने तिचा गैरवापर…”
Monika Dabade
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात अभिनेत्री झाली भावुक; ‘ठरलं तर मग’च्या टीमबद्दल म्हणाली, “आतापर्यंत हे माझ्यादेखत…”
marathi actress abhidnya bhave shares screen with abhishek bachchan
अभिषेक बच्चनसह जाहिरातीत झळकली ‘ही’ मराठी अभिनेत्री! ‘रंग माझा वेगळा’मध्ये साकारलेली खलनायिकेची भूमिका, ओळखलंत का?
Paaru
“तुम्ही पारूला सून म्हणून कधी स्वीकारणार आहात?”, श्रेया बुगडेच्या प्रश्नावर अहिल्यादेवी किर्लोस्कर म्हणाल्या…
Titeeksha Tawade
Video : ‘लव्हयापा’ म्हणत तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ; एकता व ऐश्वर्या नारकरांनी दिली साथ, पाहा व्हिडीओ
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”

जेव्हा अभिनेत्री रिया चक्रवर्ती ( Rhea Chakraborty ) भाऊ शौविकसह जेलमध्ये होती तेव्हा तिच्या मित्रांनी तिच्या आई-वडिलांची काळजी घेतली होती. ‘ह्यूमंस ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये रिया म्हणाली, “जेव्हा आम्ही जेलमध्ये होतो तेव्हा माझे अनेक मित्र वडिलांबरोबर दारू प्यायचे. तसंच आई-वडिलांबरोबर दररोज रात्री जेवायचे. ज्यावेळी मी जेल बाहेर आली, त्यावेळी सगळ्यांना पाहून मला आश्चर्याचा धक्काच बसला. मी माझ्या मित्रांना विचारलं, तुमचं एवढं वजन कसं काय वाढलं? मी तिथे जेलमध्ये होते आणि तुम्ही लोक मस्त खात होता, वजन वाढवत होता? तेव्हा मित्रांनी सांगितलं, नाही यार. आम्ही काका-काकूंच्या जेवणासाठी-पिण्यासाठी प्रयत्न करत होतो. कारण त्यांना थोडं नॉर्मल वाटावं म्हणून केलं. मी म्हटलं. वॉव.”

हेही वाचा – “हा एक माथेफिरू दिग्दर्शक…”, संतोष जुवेकरने अनुराग कश्यपसाठी लिहिली खास पोस्ट, म्हणाला, “गेले काही दिवस…”

पुढे रिया ( Rhea Chakraborty ) म्हणाली, “माझ्या वाईट काळात मित्र मंडळी हा माझा मोठा पाठिंबा होता. एकदम खंबीरपणे माझे मित्र मंडळी साथ देत होते. विशेष म्हणजे शिबानी दांडेकर. कारण यावेळेस संपूर्ण जग माझ्या विरोधात होतं. शिवाय शिबानीच्या देखील, पण ती नेहमी माझ्यासाठी उभी राहायची.”

हेही वाचा – Video: घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान अभिषेक बच्चन व ऐश्वर्या रायचा लेकीबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले…

सुशांत रिया ‘या’ व्यावसायिकाला करतेय डेट

दरम्यान, काही दिवसांपूर्वी रिया ( Rhea Chakraborty ) करोडपती व्यावसायिक निखिल कामथबरोबर दिसली होती. दोघांचा सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. रिया निखिलच्या बाईकवर मागे बसून फिरताना पाहायला मिळाली होती. त्यामुळे दोघं डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

निखिल कामथ हा एक व्यावसायिक असून त्याची ९००० कोटींहून अधिक त्याची संपत्ती आहे. भारतातील सर्वात कमी वयातील करोडपतींपैकी निखिल एक आहे. २०१९मध्ये निखिलने अमांडा पूर्वांकराबरोबर लग्न केलं होतं. पण हे लग्न काही काळचं टिकलं. २०२१मध्ये दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. आता निखिलचं नाव रियाबरोबर ( Rhea Chakraborty ) जोडलं जात आहे.

Story img Loader