हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून २०२० रोजी आत्महत्या करून जीवन संपवले. त्याचे निधन होऊन आज ३ वर्षे पूर्ण झाली आहेत. सुशांतच्या परिवाराने आणि चाहत्यांनी त्याच्या मृत्यूसाठी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला जबाबदार ठरवले होते. आज रियाने सुशांतच्या आठवणीत इन्स्टाग्रामवर खास व्हिडीओ शेअर केला असून, या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया देत तिला ट्रोल केले आहे.
हेही वाचा : Video महेश मांजरेकरांच्या लेकीची ‘ती’ कृती पाहून नेटकऱ्यांनी केले कौतुक; म्हणाले “सई मराठी आहे म्हणून…”
सुशांत सिंह राजपूतच्या तिसऱ्या स्मृतिदिनानिमित्त त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने अभिनेत्याच्या आठवणीत खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रिया दिवंगत अभिनेत्याला घट्ट मिठी मारताना दिसत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये रियाने हार्ट इमोजी आणि इन्फिनिटीचे चिन्ह दिले आहे.
हेही वाचा : “मेकअप का केलास, चेहरा धुऊन ये” प्रिया बापटने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली “मुन्नाभाई MBBS चित्रपट करताना…”
रियाने शेअर केलेला व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया देत अभिनेत्रीला ट्रोल केले आहे. एका युजरने “एवढा ढोंगीपणा करू नकोस,” अशी कमेंट केली आहे, तर दुसऱ्या एका युजरने “लोकांच्या शिव्यांपासून वाचण्यासाठी तू ही पोस्ट केली आहेस, तू सुशांतला आमच्यापासून दूर नेलेस पण आमच्या मनात त्याच्यासाठी कायम जागा आहे,”अशी प्रतिक्रिया रियाच्या व्हिडीओवर दिली आहे. तसेच एकाने “सुशांतचा स्मृतिदिन ‘अँटी नेपोटिझम दिवस’ म्हणून साजरा केला पाहिजे,” अशी मागणी कमेंट सेक्शनमध्ये केली आहे.
दरम्यान, सुशांतने छोट्या पडद्यापासून अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली होती. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेने त्याला लोकप्रियता मिळवून दिली. ‘केदारनाथ’, ‘दिल बेचारा’, ‘काय पो छे’, ‘छिछोरे’, ‘एम.एस.धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटांत काम करून त्याने बॉलीवूडमध्ये स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले होते.