अभिनेता सुशांत सिंह राजपूतने तीन वर्षांपूर्वी आत्महत्या केली. आत्महत्येनंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर अनेक आरोप झाले, टीका झाली आणि तिला चौकशीला सामोरं जावं लागलं, तुरुंगात राहावं लागलं, यासंदर्भात तिने भाष्य केलं आहे. तीन वर्षांपूर्वी ज्या परिस्थितीचा सामना तिला करावा लागला, लोकांची बोलणी ऐकावी लागली तो अनुभव तिने सांगितला आहे.

Video: गुरमीत चौधरीने भर रस्त्यात पडलेल्या व्यक्तीचा वाचवला जीव, अभिनेत्याची कृती पाहून तुम्हीही कराल कौतुक

pets cats
पाळीव प्राण्यांच्या विरहाच्या भीतीने नैराश्य, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Loksatta chaturang article English playwright Christopher Marlowe Dr Faust plays journey of life
मनातलं कागदावर : स्वर्ग की नरक?
Neelam Kothari And Mahesh Thakur
“मी तिच्या अंगावर पडलो अन् नीलमने…”, अभिनेत्याने सांगितला ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगचा किस्सा; म्हणाला, “त्यानंतर सलमानने…”
Marathi Actors Akshay Kelkar First Reaction after announced abeer gulal serial will off air
‘अबीर गुलाल’ मालिका बंद होणार असल्याचं कळताच अक्षय केळकरला बसला धक्का, म्हणाला, “मला पुन्हा स्ट्रगल…”
Tragic Video! Devotee Collapses And Dies Of Heart Attack While Circumambulating Pillar At Hyderabad Temple
बिनभरवशाचं आयुष्य! देवाच्या दारात तरुणाला मृत्यूनं कवटाळलं; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले “देवालाही दया आली नाही”
CCI probe finds Zomato, Swiggy violating competition norms
स्पर्धा आयोगाकडून चौकशीवर अंतिम निवाडा आला नसल्याचा दावा
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”

“आयुष्य एक वर्तुळ आहे. आता मी माध्यमांशी बोलत आहे. आयुष्य पुढे सरकत आहे. नवीन मी खूप वेगळी आहे. पूर्वी वयाच्या ३१ व्या वर्षी मला माझ्या आत ८१ वर्षांची वृद्ध महिला असल्यासारखं वाटायचं. कठीण काळात तुम्ही देवदास बनू शकता किंवा थेरपीची मदत घेऊन पुढे जाऊ शकता. मी थेरपीची मदत घेतली,” असं रिया ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह २०२३’ मध्ये म्हणाली.

“१८ वर्षांचं प्रेम अन्…”, ऑस्ट्रेलियात प्रिया बापट-उमेश कामतचा रोमँटिक अंदाज, लिपलॉक करतानाचा फोटो चर्चेत

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबद्दल रिया म्हणाली, “जेव्हा मी लोकांच्या चेहऱ्याकडे पाहते तेव्हा काही लोक माझ्याकडे असे पाहतात की मी काहीतरी केलं आहे. मी लोकांचे चेहरे वाचू शकते. लोक मला ‘चुडैल’ (हडळ) म्हणाले, ते नाव मला आवडलं. मला काही फरक पडला नाही. कोणास ठाऊक कदाचित मला काळी जादू माहित असेल. समाजात लोक म्हणतात की जर लग्नानंतर पुरुष जास्त दारू पिऊ लागला तर हे सर्व त्याची पत्नी येण्याने झाले. त्याच्या करिअरला उतरती कळा लागली तर त्यासाठीही पत्नीला जबाबदार धरलं जातं.”

रिया म्हणाली, “लोक मानसिक आरोग्याची स्थिती समजत नाही. तो (सुशांत) यशस्वी होता, पण त्याचे मानसिक आरोग्य का बिघडले ते मला माहीत नाही. यशस्वी लोक देखील तणावात असू शकतात. सुशांतने त्याचा जीव का घेतला हे मला माहीत नाही. मात्र तो कोणत्या परिस्थितीतून गेला हे मला माहीत आहे. मला एनसीबी आणि ड्रग्सबद्दल बोलायचे नाही.”

रियाने तिचा तुरुंगातील अनुभव सांगितला. “तुरुंग हे रंजक ठिकाण असतं, कारण तुम्ही समाजापासून वेगळे होता. तुरुंगात मला खूप काही शिकायला मिळाले. मी अंडर ट्रायल होते. मी दोषी नव्हते. आपण चित्रपटांसाठी कसे धावत राहतो हे मी शिकलो. पण तुरुंगात राहणाऱ्या महिलांना तिथे कधीतरी सामोसा मिळाला तर त्या खूप खूश होतात.”