रिया चक्रवर्ती बॉलिवूडची सर्वाधिक वादग्रस्त अभिनेत्री आहे. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर रिया चक्रवर्तीचं नाव नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असतं. पण आता तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात ती चालता-चालता धडपडताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी मात्र तिच्यावर चांगलेच संतापले आता. नेमकं काय घडलं घेऊयात जाणून…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रिया चक्रवर्तीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये ती पायऱ्या चढताना दिसत आहे. पण चालता चालता तिचा तोल जातो आणि ती धडपते, पडता-पडता वाचते. त्यावेळी रियाला असं धडपडताना पाहून तिथे असलेले पापाराझी तिला ‘सांभाळून चाल’ असा सल्ला देताना दिसतात. पण याचवेळी रियाने असं काही केलं ज्यावरून आता तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

आणखी वाचा-सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर पुन्हा प्रेमात पडली रिया चक्रवर्ती; ‘या’ व्यक्तीला करतेय डेट

रियाला जेव्हा पापाराझी सांभाळून चालण्याचा सल्ला देतात. तसं ती त्यांच्यावर भडकते आणि म्हणते, “हे तुमच्यामुळे झालं, तुम्ही पाठलाग का करत आहात माझा?” रियाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला सहानुभूती न देता चांगलंच सुनावलं आहे. रियाचं पापाराझींशी वागणं नेटकऱ्यांना अजिबात आवडलेलं नाही. तिचा तोल गेला आणि ती धडपडली यात चूक तिचीच होती असं अनेकांचं म्हणणं आहे.

आणखी वाचा- सुशांत सिंह राजपूतची हत्या झाल्याच्या दाव्यानंतर रिया चक्रवर्तीने शेअर केली पोस्ट, म्हणाली “पुढच्या वेळी…”

व्हिडीओवर कमेंट करताना एका युजरने लिहिलं, “ही दुसऱ्या कोणाची चूक कशी काय असू शकते. स्वतःची चूक कबुल करायची नाही मॅडमना.” दुसऱ्या एका युजरने लिहिलं, “आणखी किती खाली पडणार आहेस (…और कितना गिरोगी?)” तर काही लोकांनी पुन्हा एकदा सुशांतचं नाव घेत रिया चक्रवर्तीवर टीका केली आहे. तिचा हा व्हिडीओ आणि त्यातील तिचं वागणं पाहून नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.