बॉलिवूडचे कलाकार त्यांच्या चित्रपटामुळे कायमच चर्चेत असतात. चित्रपटांच्या बरोबरीने त्यांचे आयुष्यदेखील बरेच चर्चेत असते. नुकतेच आलिया भट्ट रणबीर कपूर विवाहबद्ध झाले आहेत. सध्या बॉलिवूडमधील आणखीन एक जोडपं चर्चेत आहे. अली फजल, रिचा चड्ढा या दोघांनी नुकतीच काही दिवसांपूर्वी आपल्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर शेअर केली होती. या हटके पत्रिकेची चर्चा सर्वत्र झाली होती. नुकतेच त्यांनी प्री वेडिंगचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र त्यांच्या लग्नाच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.
अली फझल, रिचा चड्ढाच्या प्रवक्त्याने माध्यमांना असं सांगितलं की ‘या दोघांनी अडीच वर्षांपूर्वी कायदेशीर लग्न केले आहे. सध्या ते आपल्या मित्र मैत्रीण, कुटुंबाबरोबर हा लग्नसोहळा साजरा करत आहेत. आपल्या लग्नाच्या निमित्ताने स्वागत समारंभ सोहळा दिल्ली, लखनौ येथे ठेवला आहे. शेवटचा स्वागत समारंभ सोहळा हा मुंबईत असणार आहे’.
‘भाभीजी घर पर हैं’ मालिकेतील कलाकारांनी प्रसिद्ध अशा रामलीला कार्यक्रमाला लावली हजेरी
प्रवक्ता पुढे म्हणाला ‘या दोघांना लग्न पंजाबी, लखनौ पद्धतीने करायचे होते. या सोहळ्यात त्यांनी जे कपडे, दागिने परिधान केले आहेत ते विशिष्ट पद्धतीने बनवले गेले आहेत. त्यांच्या प्रेमकथेला साजेसे असे डिजाईन करण्यात आले आहेत. लग्नपत्रिकेपासून ते प्री वेडिंगपर्यंत त्यांच्या प्रत्येक गोष्टीची आज चर्चा आहे. दोघे सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात.
अनेकांना त्यांच्या प्रेमकथा जाणून घेण्यात रस आहे. दोघे ‘फुकरे’ या चित्रपटाच्या सेटवर पहिल्यांदा भेटले होते. दोघांनी बरेच वर्ष एकमेकांना डेट केलं आहे. या जोडप्याने इको-फ्रेंडली विवाह सोहळा निवडला आहे. लग्नासाठी येणाऱ्या पाहुण्यांसाठी त्यांनी कोणतीच बंधन घातलेली नाही.