बॉलीवूडचं लोकप्रिय कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह लवकरच आई-बाबा होणार आहेत. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करीत त्यांनी ही बातमी चाहत्यांना दिली. प्रेग्नन्सीदरम्यान दीपिका तिच्या चित्रपटाच्या शूटिंगला आणि अनेक इव्हेंट्सना हजेरी लावताना दिसली.

नाग अश्विन रेड्डी दिग्दर्शित दीपिकाचा ‘KALKI 2898 AD’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या आठवड्यात दीपिकानं या चित्रपटाच्या प्री-रिलीज इव्हेंटला हजेरी लावली होती. यावेळेस दीपिकानं काळ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस घातला होता. तर या लूकसाठी दीपिकानं मॅचिंग हिल्स, सिल्व्हर व गोल्डन रंगाची ज्वेलरी यांची निवड केली होती. तसंच दीपिकानं पोनीटेल ही हेअरस्टाईल केली होती. दीपिकाच्या या लूकमधील बेबी बंपने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं खरं; पण याच लूकमुळे अनेकांनी तिला ट्रोलदेखील केलं होतं.

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
premature birth misunderstanding about babies born at 8 months not to survive
स्त्री आरोग्य : आठव्या महिन्यातलं मूल वाचत नाही?
sonakshi sinha reaction on pregnancy rumours
सोनाक्षी सिन्हाने गरोदर असल्याच्या अफवांवर दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “लोक वेडे…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Priya Berde
प्रिया बेर्डे यांना भविष्यात साकारायचीय ‘ही’ व्यक्तिरेखा, म्हणाल्या, “माझ्या आईने…”
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
Gashmeer Mahajani
“…तरच मूल होऊ द्या”, पालकत्वाविषयी स्पष्टच बोलला गश्मीर महाजनी; म्हणाला, “तुम्ही आई-वडील म्हणून कैद…”

हेही वाचा… विराट कोहलीला डेट करण्याआधी अनुष्का शर्माने ‘या’ तीन अभिनेत्यांना नाकारलं होतं, पण का?

एका सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सरनं सतत होणाऱ्या ट्रोलिंगमुळे दीपिकाला सपोर्ट करण्यासाठी एक खास रील शेअर केली आणि या व्हिडीओमध्ये ती म्हणाली, “ती काही लहान नाही आहे; जिला सगळं सांगावं लागेल. ती स्वत:साठी निर्णय घेऊ शकते आणि तिला इतर कोणाच्या सल्ल्याची आवश्यकता नाही.” हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. व्हिडीओ व्हायरल होताच आता अभिनेत्री रिचा चड्ढाने पुढाकार घेत, दीपिकाची बाजू मांडली आहे.

गरोदर असतानाही दीपिकानं हिल्स घातल्यामुळे काही नेटकऱ्यांनी तिला सल्ले दिले; तर काहींनी नकारात्मक कमेंट्स करीत तिला ट्रोल केलं. त्यावर आता अभिनेत्री रिचा चड्ढा म्हणाली, “No uterus, no gyaan” (गर्भाशय नाही आहे; तर फुकटचे सल्ले देऊ नका). रिचानं केलेलं हे वक्तव्य सध्या चर्चेत आहे. अभिनेत्री रिचा चड्ढादेखील गरोदर आहे आणि हा काळ तीदेखील अनुभवते आहे.

रिचा आणि अली फजलदेखील लवकरच आई-बाबा होणार आहेत. फेब्रुवारी २०२४ मध्ये दोघांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करीत याबद्दल गुड न्यूज दिली होती.

हेही वाचा… “माझा जवळजवळ गर्भपात…”, मीरा राजपूतने सांगितला ‘तो’ वाईट प्रसंग; म्हणाली, “शाहिद माझ्या डॉक्टरांशी…”

दरम्यान, रिचा चड्ढाच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर रिचा शेवटची संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हीरामंडी-द डायमंड बझार’ या वेब सीरिजमध्ये झळकली होती. त्यात रिचानं ‘लज्जो’ची भूमिका साकारली होती.

Story img Loader