बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढाने ‘गलवान’चा उल्लेख करत केलेल्या ट्वीटमुळे वाद निर्माण झाला आहे. रिचाने भारतीय लष्कराचा अपमान केल्याचा दावा करत अनेकांनी संताप व्यक्त केल्यानंतर वाद चिघळला होता. रिचाने भारतीय लष्करातील उत्तर विभागाचे लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना हे विधान केलं होतं. दरम्यान वाद वाढू लागल्यानंतर रिचाने जाहीर माफी मागितली असून कोणालाही दुखावण्याचा आपला हेतू नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यावर आता अनेक कलाकार प्रतिक्रिया देत आहे. नुकतंच अभिनेते प्रकाश राज यांनी रिचा चड्ढाचे समर्थन केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री रिचा चड्ढाने ‘गलवान’चा उल्लेख करत केलेल्या ट्वीटमुळे वाद निर्माण झाला होता. त्यावर अभिनेता अक्षय कुमारने रिचा चड्ढाच्या या ट्वीटवर नाराजी व्यक्त केली होती. “हे पाहून खूप दुःख झालं. आपल्या कोणत्याही कृतीने आपल्याला भारतीय लष्कराप्रती कृतघ्न बनवू नये. कारण आज ते आहेत म्हणून आपण आहोत.” अक्षय कुमारने तिच्या ट्वीटवर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यावर आता प्रकाश राज यांनी अक्षय कुमारला फटकारले आहे.

रिचा चढ्ढा विरोधात ट्विट केल्यानंतर दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनी अक्षय कुमारला फटकारले. प्रकाश राज यांनी अक्षयच्या ट्वीटला रिट्वीट केले आहे. त्यावर ते म्हणाले, “अक्षय कुमार मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुझ्यापेक्षा रिचा चड्ढा ही आमच्या देशाशी जास्त संबंधित आहे.”

याआधीही प्रकाश राज यांनी रिचा चड्ढाचे गलवानचा उल्लेख असलेल्या ट्वीटला समर्थन दर्शवले होते. “रिचा चढ्ढा आम्ही तुझ्याबरोबर आहोत. तुला काय म्हणायचे आहे ते आम्हाला माहीत आहे”, असे त्यांनी म्हटले होते.

दरम्यान हा वाद वाढल्यानंतर रिचाने जाहीर माझी मागितली, “माझा कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. माझ्या शब्दांमुळे अनावधानाने जरी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागते,” असं रिचा चड्ढा म्हणाली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Richa chadha is more relevant to our country than you said prakash raj to akshay kumar nrp