‘मिर्झापूर’, ‘फुकरे’, ‘खामोशियाँ’, ‘व्हिक्टोरियाँ अँण्ड अब्दुल’, या आणि अशा अनेक चित्रपट व वेब सीरिजमध्ये काम करत अली फजलने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मिर्झापूरमधील गुड्डू पंडितची त्याची भूमिका विशेष गाजली. आता मात्र अली फजल व रिचा चड्ढा (Richa Chadha) यांनी एका मुलाखतीत केलेले वक्तव्य लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रिचा चड्ढा काय म्हणाली?

अभिनेता अली फजल व रिचा चड्ढा या सेलिब्रिटी जोडप्याने नुकताच स्क्रीनबरोबर संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेकविध गोष्टींवर गप्पा मारल्या. त्यांचे मत व्यक्त केले. वैयक्तिक तसेच व्यावसायिक आयुष्यातील अनेक गोष्टी त्यांनी शेअर केल्या. याचबरोबर मुलाला योग्यप्रकारे वाढवण्यासाठी जबाबदारी स्त्रीची का असते, पुरुषांकडून अशी अपेक्षा ठेवली जात नाही, यावरदेखील अभिनेत्रीने भाष्य केले आहे.

या मुलाखतीत रिचा चड्ढाला विचारले की, मुलांना योग्यप्रकारे वाढविण्याचे, त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्त्रियांच्या खांद्यावर का असते? पुरुषांकडून अशी अपेक्षा ठेवली जात नाही. यावर उत्तर देताना अभिनेत्रीने म्हटले, “मुलाला जन्माला घालण्यासाठी स्त्री व पुरुष दोघांची गरज लागते, तसेच त्याला शिक्षण देण्यासाठीसुद्धा दोघेही आवश्यक असतात. पालक ज्या पद्धतीने वागतात, ज्या पद्धतीने ते जगाला सामोरे जातात, त्यातून तुमचे संगोपन कसे झाले आहे ते दिसते.”

याबद्दल अधिक बोलताना रिचा चड्ढाने गिझेल पेलिकॉट (Gisele Pelicot)चे उदाहरण दिले. गिझेल पेलिकॉटला तिच्या पतीने ड्रग्ज दिले होते व अनेक पुरुषांनी तिच्यावर बलात्कार केला होता. गिझेल पेलिकॉटने म्हटले होते, “लाज कोणाला वाटली पाहिजे हे बदलू द्या. महिलेला बलात्काराची लाज वाटली नाही पाहिजे, ज्या पुरुषाला स्वत:वर नियंत्रण ठेवता आले नाही, त्याला लाज वाटली पाहिजे”, असे गिझेल पेलिकॉटने म्हटले होते. पुढे बोलताना अभिनेत्रीने म्हटले, “त्यामुळे मला वाटते की, केवळ स्त्रियांनीच त्यांच्या मुलांचे योग्य प्रकारे संगोपन केले पाहिजे असे नाही, तर पुरुषांनीदेखील त्यांच्या मुलांना चांगल्या प्रकारे वाढवले पाहिजे. “बेटा पढाओ, बेटी बचाओ”, अशा पद्धतीने रिचा चड्ढाने मुलांना योग्य पद्धतीने वाढविण्याची जबाबदारी महिलांबरोबर पुरुषांचीदेखील तितकीच असल्याचे म्हटले.

याबरोबरच अली फजलला विचारण्यात आले की, तू ‘मिर्झापूर’ या वेबसीरिजमध्ये गुड्डू पंडितची भूमिका साकारली आहेस. गुड्डू पंडित हा गंभीर स्वभावाचा, सहज भावना व्यक्त न करणारा आहे. काही दिवसांपूर्वी तुला तुझ्या मुलीची आठवण येत होती, असे म्हणाला होतास. गुड्डू पंडित इतका भावनिक असेल का? पुरुषांनी त्यांची भावनिक बाजू दाखवली, स्वीकारली पाहिजे का? अशा आशयचा त्यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना अली फजलने म्हटले, “ज्यांनी तो शो पाहिला आहे, त्यांना ते पात्र किती भावनिक अस्थिर आहे हे माहीत आहे. वागणुकीसंबंधी पुरुषांना अडचणी, काही गंभीर अडचणी असतात; त्यावर मुळापासून काम झालं पाहिजे.”

हेही वाचा: Video: “वेलकम बेबी…”, ‘आई कुठे काय करते’ फेम रुपाली भोसलेने घेतली मर्सिडीज बेंझ, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “आयुष्यात फक्त…

दरम्यान, रिचा चड्ढाने ‘हिरामंडी’ या वेबसीरिजमधून प्रेक्षकांचे मन जिंकले होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Richa chadha on why do women have to shoulder the responsibility of raising their sons right nsp