बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने १५ वर्षांपूर्वी २००८ मध्ये दिबाकर बॅनर्जी यांच्या ‘ओये लकी लकी ओये’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तिने तेव्हापासून आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. जवळपास दीड दशकं बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या रिचाने करिअरच्या सुरुवातीच्या दिवसात झालेल्या भेदभावाबद्दल सांगितलं आहे. एकदा तिचे सामान व्हॅनिटी व्हॅनमधून बाहेर फेकले गेले होते, असा खुलासा तिने केला आहे.

बालकलाकार साईशाची आई पूजाच्या घराची पोलिसांनी घेतली झडती; महत्त्वाची कागदपत्रे केली जप्त, तिच्या सासरचे लोक म्हणाले…

Milind Gawali
“त्या मावशींनी मला शिव्यांची लाखोली…”, ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींनी सांगितला किस्सा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
bhagya dile tu mala fame actress surabhi bhave will appear in the new series Tu Hi Re Maza Mitwa of Star Pravah
‘भाग्य दिले तू मला’ फेम अभिनेत्री झळकणार ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत, प्रोमो शेअर करत म्हणाली, “कलाकार म्हणून कायमच…”
amar upadhayay mihir virani
पांढऱ्या साड्या नेसून आलेल्या महिलांनी घराबाहेर घातला होता गोंधळ; अभिनेता खुलासा करीत म्हणाला, “माझ्या आईला…”
Shruti Haasan With Parents
“लोक माझ्याकडे बोट दाखवायचे अन्…”, प्रसिद्ध अभिनेत्री घटस्फोटित आई-वडिलांना म्हणाली ‘हट्टी’
Neelam Kothari And Mahesh Thakur
“मी तिच्या अंगावर पडलो अन् नीलमने…”, अभिनेत्याने सांगितला ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगचा किस्सा; म्हणाला, “त्यानंतर सलमानने…”
vidya balan on sridevi
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचं कौतुक करत विद्या बालनने व्यक्त केली इच्छा; म्हणाली, “मला त्यांना…”
Mumbai High Court
“मुलीने हॉटेलची खोली बुक केली म्हणजे तिची शारीरिक संबंधांना संमती आहे असे नाही,” उच्च न्यायालयाचं परखड मत!

जेव्हा रिचा तिचा पहिला चित्रपट ‘ओये लकी लकी ओये’ ची शूटिंग करत होती, तेव्हा ती कॉलेजमध्ये होती आणि थेट कॉलेजमधून शूटिंगसाठी आली होती. रिचा म्हणाली, “आम्ही आमच्या सेटवर भेदभाव करत नाही. कोणी खूप चांगल्या हॉटेलमध्ये थांबेल आणि कोणी स्वस्त हॉटेलमध्ये राहील, असं आम्ही करत नाही. मी पण सगळ्यांसोबत एकाच हॉटेलमध्ये राहते आणि अलीही. आम्ही सर्वांना त्यांची स्पेस देतो, मग ते कार्यशाळेसाठी असो किंवा इतर कोणत्याही गोष्टीसाठी.”

बालकलाकार साईशा भोईरची आई पोलीस कोठडीत, तर वडील फरार; सगळी संपत्ती होणार जप्त, नेमकं प्रकरण काय?

रिचा पुढे म्हणाली, “आम्ही स्वतः अभिनेते आहोत, त्यामुळे आमची सहानुभूती असते. सेटवरचा भेदभाव एखाद्याच्या मनावर कसा परिणाम करतो हे आम्ही समजू शकतो. भेदभावामुळे एखाद्याचे खच्चीकरण होऊ शकते. कारण करिअरच्या सुरुवातीच्या काळात आमच्यासोबत असं घडलं आहे. तेव्हा एक व्हॅनिटी व्हॅन आम्ही तीन जणांनी शेअर केली होती, तर एका कलाकाराला मात्र एकट्याला पूर्ण व्हॅनिटी व्हॅन मिळाली होती.”

“माझ्या पहिल्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मी कॉलेजमधून थेट आले होते. त्यावेळी मला १०३-१०४ डिग्री ताप आला होता. मला सांगण्यात आलं की दुसरी व्यक्ती उशिरा येईल तोपर्यंत मी त्यांची व्हॅनिटी व्हॅन वापरू शकते. मी तयार झाले आणि शूटसाठी गेले. तेवढ्यात कोणीतरी तिथं आलं आणि माझं सर्व सामान व्हॅनिटी व्हॅनच्या बाहेर फेकून दिलं. ‘हे सगळं खूप भयानक होतं, त्यावेळी माझ्याकडे स्वत:चे मेकअप आणि इतर सामान नव्हते, ते कंपनीने दिलेले होते. सामान फेकल्याने कोणाची लिपस्टिक खराब झाली, तर कोणाचा आरसा तुटला होता, तेव्हा मला खूप वाईट वाटलं होतं. ते असं कसं करू शकतात? असं कसं वागू शकतात, असे प्रश्न मला पडायचे. पण या गोष्टी घडत राहतात. सुदैवाने, आता सोशल मीडिया आहे, लोकांच्या फोनमध्ये कॅमेरे आहेत, त्यामुळे कोणीही अशा गोष्टी करत नाहीत,” असं रिचा म्हणाली.