बॉलीवूड अभिनेत्री रिचा चड्ढा (Richa Chadha) व अली फझल लवकर आई-बाबा होणार आहेत. याच महिन्यात त्यांच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन होणार आहे. रिचा व अली आपल्या पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी खूप उत्सुक आहेत. आता रिचाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मॅटर्निटी शूटमधील काही सुंदर फोटो शेअर केले आहे, पण तिने या पोस्टचे कमेंट सेक्शन बंद ठेवले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रिचाने अलीबरोबर मॅटर्निटी फोटोशूट केलं. या फोटोंमध्ये रिचाच्या बेबी बंपवर फोकस करण्यात आले आहे. एका फोटोमध्ये रिचा पती अली फजलच्या मांडीवर झोपलेली दिसत आहे, तर अलीने तिच्या बेबी बंपवर हात ठेवला आहे. या सुंदर फोटोंबरोबर रिचाने एक खास कॅप्शन लिहिलं आहे. रिचाने या पोस्टच्या कमेंट्स बंद का केल्या यामागचं कारणही स्वतः कॅप्शनमध्ये सांगितलं आहे.

हेही वाचा – “माझ्या कुटुंबाला…”, अली फजलशी आंतरधर्मीय लग्न करण्याबाबत पहिल्यांदाच बोलली रिचा चड्ढा

रिचाने लिहिलं, “एवढं निर्मळ प्रेम जगाला प्रकाशाच्या किरणांशिवाय दुसरं काय देऊ शकतं? अली या सुंदर प्रवासात तू माझा सोबती झालास त्याबद्दल धन्यवाद. आम्ही नकारात्मकतेवर मात करणारं, करुणा व सहानुभूती असलेलं आणि सर्वांना भरभरून प्रेम देणारं बाळ या जगात आणू अशी आम्हाला आशा आहे. आमेन!”

याचबरोबर रिचाने संस्कृतमधील दोन ओळी शेअर केल्या.

ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते॥

सर्वात शेवटी तिने कमेंट्स ऑफ करण्यामागचं कारण सांगितलं. “ही मी पोस्ट केलेली सर्वात खासगी गोष्ट आहे, त्यामुळे कमेंट्स बंद केल्या आहेत,” असं रिचाने लिहिलं. कमेंट्स ऑफ असल्या तरी रिचाच्या या पोस्टवर चाहते व सेलिब्रिटी लाइक्सचा वर्षाव करत आहेत. दिया मिर्झा, आयुष्मान खुराना, नुपूर शिखरे यांच्यासह चाहत्यांनी ही पोस्ट लाइक केली आहे.

सात वर्षे डेट केल्यावर बांधली लग्नगाठ

अली व रिचाच्या लव्ह स्टोरीबद्दल बोलायचं झाल्यास, दोघेही पहिल्यांदा ‘फुकरे’ चित्रपटाच्या सेटवर भेटले होते, नंतर ते प्रेमात पडले. अली व रिचा यांनी जवळपास सात वर्षे एकमेकांना डेट केलं होतं. रिचाने सांगितलं होतं की तिने व अलीने २०२० मध्ये विशेष विवाह कायद्यांतर्गत लग्न केलं होतं.

रिचा चड्ढा व अली फजल (फोटो – इन्स्टाग्राम)

करोना काळात लग्न केल्याने त्याबद्दल कोणालाच माहीत नव्हतं. त्यानंतर दोघांनी २०२० मध्ये त्यांनी मित्र व कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्न केलं. आता लग्नानंतर चार वर्षांनी ते दोघेही आई-बाबा होणार आहेत. याच महिन्यात ते त्यांच्या बाळाचं स्वागत करणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Richa chadha turns off comments on pregnancy shoot ali fazal hrc