बॉलीवूड अभिनेत्री रिचा चड्ढा तिच्या उत्तम अभिनयासाठी ओळखली जाते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘फुकरे ३’ या चित्रपटात भोली पंजाबनची भूमिका साकारून चाहत्यांची मनं जिंकली. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला होता. रिचाने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय, ज्यात तिने विविधांगी भूमिका साकारल्या आहेत.
रिचाने ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘मसान’ आणि ‘लव्ह सोनिया’ यात वेगळ्या धाटणीच्या भूमिका केल्या. या चित्रपटांमधील तिच्या अभिनयाचे समीक्षकांकडून खूप कौतुक झाले होते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रिचाने खुलासा केला आहे की, एके काळी तिला हृतिक रोशनच्या आईची भूमिका ऑफर करण्यात आली होती. त्यावेळी रिचा फक्त २१ वर्षांची होती. तिने ही ऑफर नाकारली होती, पण इतकी वर्षे सिनेसृष्टीत काम करूनही कास्टिंग डायरेक्टरने अशा भूमिकेची ऑफर दिल्याने ती खूप निराश झाली होती.
श्वेता बच्चन आई-वडिलांसह मुंबईत का राहते? पतीबरोबर न राहण्याचं कारण काय? जाणून घ्या
रिचा चड्ढाने ‘एबीपी न्यूज’ला मुलाखत दिली. यावेळी ‘तुला हृतिकच्या आईची भूमिका ऑफर झाली होती का?’ असं तिला विचारण्यात आलं. रिचा म्हणाली, “होय, वयाच्या २१ व्या वर्षी एका कास्टिंग डायरेक्टरने मला ही भूमिका ऑफर केली होती. त्याला कोणीतरी सांगितलं होतं की मी एका वयस्कर स्त्रीची भूमिका चांगल्या प्रकारे साकारते म्हणून त्याने विचार न करता मला या भूमिकेची ऑफर दिली. मी नकार दिल्यानंतर ती भूमिका साकारणारी अभिनेत्री खूप चांगली कलाकार आहे. तरुण कलाकारांचे मेकअपच्या मदतीने वय वाढवून त्यांना चित्रपटात कास्ट करणे चुकीचे आहे, असं मला वाटलं. मी ही भूमिका स्वीकारली तर त्या भूमिकेसाठी खरोखर योग्य असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्रींवर अन्याय होईल, असंही मला वाटलं होतं. कारण ज्येष्ठ अभिनेत्रींकडे पर्याय कमी असतात. ही ऑफर नाकारल्यानंतर त्या कास्टिंग डायरेक्टरने मला कधीही फोन केला नाही,” असा खुलासाही रिचाने यावेळी केला.
“मी नेहमी चुकीच्या लोकांना डेट केलंय”, नीना गुप्ता यांचं वक्तव्य; म्हणाल्या, “खूप फालतू अन् वाईट…”
दरम्यान, अनुराग कश्यपच्या ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटात रिचा चढ्ढाने नवाजुद्दीन सिद्दिकीच्या आईची भूमिका साकारली होती. अनुराग कश्यपच्या या चित्रपटात ३०-४० वर्षांची कथा दाखवण्यात आली होती, ज्यामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी आणि हुमासह सर्व पात्रांचे वय वाढतानाची कथाही होती, असं रिचाने त्यावेळी म्हटलं होतं.