सिनेविश्वाचं आणि क्रिकेटचं जवळचं नातं आहे. विराट कोहली-अनुष्का शर्मा, अथिया शेट्टी-केएल राहुल अशी अभिनेत्री व क्रिकेटपटूंची जोडपी आहेत. एकेकाळी भारतातील आताचा सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या प्रेमात पडला होता. दोघांना लग्नही करायचं होतं; मात्र तो मॅच फिक्सिंगमध्ये अडकला आणि त्यांची प्रेमकहाणी अपूर्ण राहिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

९० च्या दशकात माधुरी व या क्रिकेटपटूच्या लव्ह स्टोरीची खूप चर्चा झाली होती. एका मॅगझिनच्या फोटोशूटवेळी भेटलेले हे दोघे प्रेमात पडले; मात्र नंतर त्यांचं नातं तुटलं. मग माधुरी दीक्षितने डॉ. नेनेंशी लग्न केलं, तर या क्रिकेटपटूनेही दुसरी जोडीदार निवडली. हा क्रिकेटपटू म्हणजे जामनगरचा राजा अजय जाडेजा होय.

हेही वाचा – घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ऐश्वर्या रायने हटवलं ‘बच्चन’ आडनाव? दुबईतील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

माधुरी व अजयची प्रेमकहाणी कशी सुरू झाली?

Madhuri Dixit Ajay Jadeja love story: अजय जाडेजा त्यावेळी टीम इंडियाचा उपकर्णधार होता. मुलींमध्ये त्याची चांगलीच क्रेझ होती. माधुरी व अजय यांची पहिली भेट एका मॅगझिनच्या फोटोशूटदरम्यान सुरू झाली. पहिल्या भेटीनंतर दोघांची मैत्री झाली आणि हळूहळू ते प्रेमात पडले. दोघेही नात्यात होते; मात्र अजयच्या कुटुंबाने त्यांच्या लग्नासाठी नकार दिला असं म्हटलं जातं. तो माधुरीबरोबर असतानाच त्याच्या खेळावर परिणाम झाला आणि त्याचा परफॉर्मन्स खराब झाला.

माधुरी दीक्षित व अजय जाडेजा (फोटो – सोशल मीडियावरून साभार)

हेही वाचा – ‘बाहुबली’ फेम अभिनेता ४७ व्या वर्षी अडकला लग्नबंधनात, पत्नीबरोबरचा समुद्रकिनाऱ्यावरील फोटो केला शेअर

मॅच फिक्सिंगमध्ये अडकला अजय जाडेजा

‘जागरण’ने दिलेल्या वृत्तानुसार, अजय जाडेजा मॅच फिक्सिंग प्रकरणात अडकला आणि त्याची व माधुरीची प्रेमकहाणी अपूर्ण राहिली. मोहम्मद अझरुद्दीनबरोबर मॅच फिक्सिंग प्रकरणात अडकलेल्या जाडेजाशी माधुरी व तिच्या कुटुंबाने संबंध तोडले. माधुरीने हे नातं संपवलं आणि ती अमेरिकेला गेली. तिथे ती डॉ. श्रीराम नेने यांना भेटली आणि दोघांनी लग्न केले. त्यानंतर जाडेजाने २००० मध्ये अदिती जेटलीशी लग्न केले.

हेही वाचा – अभिषेक बच्चन घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान पहिल्यांदाच ऐश्वर्या रायबद्दल म्हणाला, “मला माहीत आहे की ऐश्वर्या…”

अजय जाडेजाची संपत्ती

Ajay Jadeja Net Worth: जामनगरच्या राजघराण्याने ऑक्टोबर २०२४ मध्ये अजय जाडेजाला राजघराण्याच्या गादीचा वारसदार घोषित केलं. यानंतर त्याच्या संपत्तीत मोठी वाढ झाली. आधी २५० कोटींचा मालक असलेल्या जाडेजाची एकूण संपत्ती नंतर १४५५ कोटी रुपये झाली. निवृत्तीनंतर तो कॉमेंट्री आणि कोचिंगमधून कमाई करत होता. आता तो विराट कोहलीला मागे टाकत भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Richest indian cricketer ajay jadeja madhuri dixit incomplete love story hrc