भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील एक प्रभावी व दिग्गज अभिनेते म्हणून दिवंगत अभिनेते राज कपूर (Raj Kapoor) यांचे नाव घेतले जाते. राज कपूर यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. १४ डिसेंबरला १०० वर्षे पूर्ण होणार आहेत. ‘गौरी’, ‘चित्तोर विजय’, ‘आग’, ‘मेरा नाम जोकर’, ‘वाल्मीकी’, ‘जेल यात्रा’, ‘दिल की रानी’, ‘मेरा देश मेरा धर्म’, ‘नौकरी’, ‘गोपीचंद जासूस’ अशा अनेक चित्रपटांत राज कपूर यांनी काम केले. अभिनयाबरोबरच त्यांनी चित्रपटांचे दिग्दर्शन व निर्मितीसुद्धा केली. दिवंगत अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांचे ते वडील होते. ऋषी कपूर यांनी त्यांचे वडील राज कपूर यांच्याबरोबरचे नाते कसे होते, यावर अनेकदा वक्तव्य केले होते. ऋषी कपूर यांनी आत्मचरित्रात याबद्दल उल्लेख करीत लिहिले होते की, लहान असताना त्यांच्या नात्यात तणाव होता. मात्र, फार कमी लोकांना हे माहीत आहे की, शेवटच्या काही वर्षांत त्यांच्यात खास बॉण्डिंग तयार झाले होते. आता राज कपूर यांची नात व ऋषी कपूर यांची मुलगी रिद्धिमा कपूरने केलेल्या वक्तव्याची चर्चा होताना दिसत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा