रिद्धी डोगरा सध्या तिच्या आगामी ‘लकडबग्घा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. छोट्या पडद्यावर अप्रतिम अभिनयाची चुणूक दाखवणारी रिद्धी आता या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. ‘लकडबग्घा’ हा चित्रपट देशात आणि जगात प्राण्यांच्या हिंसेविरोधात आधारलेला आहे. आता या चित्रपटाच्या कथेबाबत बोलली आहे.
‘ओटीटी प्ले’ वेबसाईटशी संवादादरम्यान ती म्हणाली, “काही वर्षांपूर्वी कोलकात्यात बिर्याणीमध्ये कुत्र्याचे मांस वापरल्याची बातमी वाचून मला धक्का बसला होता. २०१८ मध्येही मी जेव्हा फास्ट फूडमध्ये कुत्रे-मांजरांच्या मांसाचा संशयास्पद वापर झाल्याची बातमी वाचली तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कोलकात्यात बिर्याणीमध्ये कुत्र्याचे मांस वापरले होते, ही बातमी समोर आल्यानंतर मी चक्रावून गेले होते.”
आणखी वाचा : ‘वेड’ची यशस्वी घोडदौड, ‘सैराट’पाठोपाठ मोडला ‘या’ चित्रपटाचा विक्रम
पुढे ती म्हणाली, “या चित्रपटात काम करत असताना मला भारतातील प्राण्यांच्या बेकायदेशीर व्यापाराबद्दल बरंच काही शिकायला मिळालं आणि हे सर्व जाणून घेतल्याने माझे डोळे उघडले. आजूबाजूला प्राण्यांच्या बाबतीत कोणत्या क्रौर्य घडत आहे आणि आपण त्याविषयी आपल्यातले अनेकजण पूर्णपणे अनभिज्ञ आहेत हे जाणून खरोखरच धक्का बसला.”
हेही वाचा : ‘भूल भुलैय्या’ चित्रपटाचा तिसरा भाग येणार येणार प्रेक्षकांच्या भेटीला, ‘हा’ अभिनेता साकारणार प्रमुख भूमिका
रिद्धी डोगरा आणि अंशुमन झा यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन विक्टर मुखर्जी यांनी केलं आहे. ‘लकडबग्घा’ हा चित्रपट १३ जानेवारी रोजी प्रदर्शित होईल.