अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख मागच्या काही काळापासून सातत्याने त्यांच्या ‘वेड’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या टीझरमधील रितेश व जिनिलीयाची केमिस्ट्री पाहून प्रेक्षक थक्क झाले. तशीच त्यांची खऱ्या आयुष्यातल्या केमिस्ट्रीही प्रेक्षकांच्या नेहमीच पसंतीस पडत असते. आता त्यांच्यातल्या या बॉण्डिंगचं रहस्य रितेशने उलगडलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रितेश आणि जिनिलीयाने ‘सकाळ स्वास्थ्यम्’ या कार्यक्रमाला हजेरी लावली. तेव्हा ते त्यांच्या नात्याबद्दल भरभरून बोलले. रितेश म्हणाला, “जिनिलियानी नियम केला आहे की, आपण एकमेकांना देत असलेली भेटवस्तू जर ५००० रुपयांपेक्षा अधिक किमतीची असेल तर मग वर्षभरात आणखी वेगळं काही गिफ्ट एकमेकांना द्यायचं नाही. महागड्या वस्तूंपेक्षाही एकमेकांना दिलेला वेळ ही सर्वात मौल्यवान भेट असते असं तिचं म्हणणं असतं. नात्यात मोठ मोठ्या गिफ्ट किंवा दिखाव्याची गरज नसते, तर एकमेंकाना वेळ दिला की नातं आपोआप जपलं जातं.”

आणखी वाचा : अथांग समुद्र, रोमान्स आणि वेड्यासारखं प्रेम; चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

पुढे तो म्हणाला, “आपण नात्यावर अपेक्षांचं ओझं लादतो. समोरच्या व्यक्तीची गरज मोठी झाली की नातं अयशस्वी होतं. तसंच समोरच्या व्यक्तीची कितीही मोठी चूक असली तरी माफ करायला शिकलं पाहिले. यामुळे नातं आणखी मजबूत होतं.”

हेही वाचा : “माझे अश्रू आणि यश…”, बालपणीचे फोटो शेअर करत जिनिलीया देशमुखची आईसाठी खास पोस्ट

‘वेड’ या चित्रपटाचं दिग्दर्शन स्वतः अभिनेता रितेश देशमुखनेच केलं आहे. तसेच या चित्रपटाद्वारे अभिनेत्री जिनिलीया देशमुख मराठी चित्रपटसृष्टी पदार्पण करत आहे. अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे आणि अभिनेत्री जिया शंकर इत्यादी कलाकार या चित्रपटात भूमिका साकारत आहेत. संगीतकार अजय अतुल यांनी वेड चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. हा चित्रपट 30 डिसेंबर रोजी प्रदर्शित होईल.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rietesh deshmukh talked about his relation with his wife genelia rnv