अभिनेत्री परिणीती चोप्रा व आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांच्या नात्याबद्दल मागच्या काही दिवसांपासून बऱ्याच चर्चा सुरू आहेत. दोघे एकमेकांना डेट करत आहेत, लवकरच ते लग्न करणार आहेत, अशा बातम्या येत आहेत. राघव यांनी तर तुम्हाला लवकरच सेलिब्रेशनची संधी मिळणार असल्याचंही म्हटलं होतं. अशातच आता परिणीतीच्या हातातील अंगठीने लक्ष वेधलं आहे.
परिणीती बऱ्याचदा एअरपोर्टवर दिसत आहे. दिल्ली व मुंबई विमानतळावर अनेकदा तिला पापाराझींनी कॅमेऱ्यात कैद केलं. काही वेळा ती व राघव एकत्र दिसले. अशातच तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्या व्हिडीओत तिच्या हातात अंगठी दिसत आहे. तिच्या हातातील अंगठी पाहून त्यांनी एंगेजमेंट केली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये परिणीती कॅज्युअल शर्ट व जीन्स घालून दिसत आहे. ती गाडीत जाताना तिच्या डाव्या हातात एक अंगठी दिसत आहे. त्यामुळे तिची एंगेजमेंट झाली असावी, अशी चर्चा आहे.