Rishi Kapoor Last Wish : अभिनेते ऋषी कपूर यांचे २०२० मध्ये निधन झाले. ऋषी कपूर यांच्या पत्नी नीतू कपूर व त्यांची मुलगी रिद्धिमा कपूर-साहनी या त्यांचे फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असतात आणि विविध मुलाखतींतूनही त्यांच्या आठवणींना उजाळा देतात. ऋषी कपूर यांची मुलगी रिद्धिमा कपूर-साहनीनं अलीकडेच एका मुलाखतीत ऋषी कपूर यांच्या आठवणी सांगताना त्यांच्या अखेरच्या दोन इच्छा सांगितल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत रिद्धिमाने तिच्या वडिलांच्या अखेरच्या दोन इच्छा सांगितल्या. त्यांच्या दोन इच्छांपैकी एक इच्छा पूर्ण झाली असून, एक इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. रिद्धिमाने ऋषी कपूर यांच्या शेवटच्या इच्छांविषयी बोलताना सांगितलं, “त्यांची पहिली इच्छा होती की, रणबीरचा विवाह व्हावा.

हेही वाचा…‘भागम भाग’ सिनेमाचा सिक्वेल येणार, कोण साकारणार मुख्य भूमिका? जाणून घ्या…

रिद्धिमा पुढे म्हणाली, “रणबीरच्या लग्नाबरोबरच त्यांच्या वांद्रे येथील घराचं बांधकाम पूर्ण व्हावं ही त्यांची दुसरी इच्छा होती. आमच्यासाठी हे खूप भावनिक होतं. मला खरंच वाटतं की, ते आज आमच्याबरोबर असायला हवे होते; पण देवाच्या योजना वेगळ्या होत्या.”

ऋषी कपूर यांच्या निधनाच्या दोन वर्षांनंतर म्हणजे २०२२ मध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी लग्न केलं. त्यामुळे ऋषी कपूर यांची पहिली इच्छा पूर्ण झाली. तर, वांद्रे येथील कपूर कुटुंबाच्या घराचं काही वर्षांपासून बांधकाम सुरू होतं आणि आता ते पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे ऋषी कपूर यांची अखेरची इच्छा पूर्ण होणार आहे.

हेही वाचा…‘क्रिश ४’ चित्रपटाबद्दल धक्कादायक माहिती आली समोर, दिग्दर्शक राकेश रोशन यांनी केला खुलासा; म्हणाले, “यापुढे मी…”

रणबीर-आलियाच्या साध्या आणि खास लग्नाची आठवण

रणबीर आणि आलियाच्या लग्नाबद्दल रिद्धिमानं सांगितलं की, तिचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं होतं; परंतु रणबीर आणि आलिया यांनी साध्या पद्धतीनं लग्न करण्याचा निर्णय घेतला. रिद्धिमा म्हणाली,“माझं लग्न थाटामाटात पार पडलं आणि त्यामुळे मला खूप काही एन्जॉय करता आलं नाही. माझ्या वडिलांना खूप मोठं लग्न करायचं होतं आणि त्यांनी तसं केलंही. पण रणबीरचं मत वेगळं होतं. तो म्हणाला, ‘आम्ही कुटुंबात मोठं लग्न पाहिलं आहे. यावेळी साधेपणानं करू.’ रणबीर खूप साधा मुलगा आहे. आलियाही तशीच साधी आहे. त्यामुळे त्यांना कमी लोकांमध्ये लग्न करायचं होतं.”

हेही वाचा…‘या’ कारणामुळे शाहरुख खान सोडणार होता बॉलीवूड; दिल्लीला जाण्याची तयारी करत पकडलं होतं विमान, पण…

रणबीर आणि आलियानं लग्नाच्या वेळी त्यांना महत्त्वाचे वाटणारे, नेहमी संपर्कात असणारे लोकच बरोबर असावेत, असं ठरवलं. रिद्धिमा म्हणाली, “त्यांनी सांगितलं की, ‘आम्हाला फक्त जवळचे लोक हवे आहेत, ज्यांच्याबरोबर आम्ही रोज संपर्कात असतो. त्यांच्याबरोबर आम्हाला आमचं लग्न एन्जॉय करायचं आहे.’ यामुळे ते प्रत्येक पाहुण्याला वेळ देऊ शकले आणि चांगल्या आठवणी तयार करू शकले.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rishi kapoor daughter riddhima kapoor sahni reveals his last two wishes psg