रणबीर कपूर व आलिया भट्टच्या ‘ब्रह्मास्त्र: पार्ट वन शिवा’ या बहुचर्चित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. ४०० कोटींपेक्षा अधिक गल्ला जमवणाऱ्या या चित्रपटाने प्रेक्षकांनी मनं जिंकली. या चित्रपटाला बनवण्यासाठी दिग्दर्शक अयान मुखर्जी याला तब्बल ८ वर्षांहून अधिक काळ लागला होता. ‘ब्रह्मास्त्र: पार्ट वन शिवा’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच रणबीर व ऋषि कपूर यांच्यात खूप वाद होत असतं; याचा खुलासा स्वतः रणबीर कपूरने अलीकडे झालेल्या एका मुलाखतीतून केला आहे.
रणबीर म्हणाला की, “मी ‘ब्रह्मास्त्र: पार्ट वन शिवा’ या चित्रपटाबाबत खूप उत्साहित होता. या चित्रपटात मी आलियाबरोबर काम करत होतो. त्यामुळे हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास होता. पण या चित्रपटाच्या शूटिंगला लागणारा वेळ पाहून बाबा, ऋषी कपूर खूप चिडायचे. तुम्ही तुमचा वेळ व्यर्थ घालवत आहात. हा चित्रपट चालणार नाही, असं सतत सांगायचे.”
“अयान आणि माझ्याबरोबर बाबा खूप वाद घालतं असतं. तुम्ही काय करताय? चित्रपट बनवण्यासाठी इतका वेळ कोण घेत? आणि एवढे पैसे कोण खर्च करत? असं सतत आम्हाला बोलत असतं. मला तर नेहमी बोलायचे, रणबीर तू या चित्रपटाच्या माध्यमातून एकही रुपया कमवू शकणार नाही. वीएफफक्सचे चित्रपट कोण पाहत? भारतात तर कोणचं वीएफएक्स चित्रपट पाहत नाहीत?,” असं सांगत रणबीरने ऋषी कपूर यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
हेही वाचा – “स्टंट कर…”, ‘खतरों के खिलाडी १३’ मध्ये जखमी झालेल्या शिव ठाकरेला आईने दिलेला सल्ला
हेही वाचा – आता मोठ्या पडद्यावर बिग बी साकारणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका? चित्रपटाची कहाणी काय असणार जाणून घ्या
दरम्यान, रणबीरच्या कामाबाबत बोलायचं झालं तर, ‘अॅनिमल’ या आगामी चित्रपटात तो झळकणार आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच ही नवी कोरी जोडी प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे.