प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री नीतू कपूर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. ‘दीवार’, ‘अमर अकबर अँन्थनी’, ‘कभी कभी’, ‘परवरिश’, ‘दो दुनी चार’ अशा चित्रपटांतून अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या नीतू कपूर यांनी ७०-८०चं दशक गाजवलं. नीतू कपूर यांनी १९८० साली सुप्रसिद्ध अभिनेता ऋषी कपूर यांच्याशी लग्नगाठ बांधली. लग्नानंतरही ऋषी कपूर यांचे प्रेमसंबंध होते.
नीतू कपूर यांनी एका मुलाखतीत ऋषी कपूर यांच्या लग्नानंतरच्या अफेअरबाबत भाष्य केलं होतं. ‘इंडिया टुडे’ने दिलेल्या माहितीनुसार, नीतू कपूर यांनी काही वर्षांपूर्वी एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत या गोष्टीचा खुलासा केला होता. ऋषी कपूर यांना फ्लर्ट करताना पाहिल्याचं नीतू कपूर यांनी मुलाखतीत सांगितलं होतं.
“ऋषी कपूर यांना फ्लर्ट करताना मी अनेकदा पकडलं आहे. त्यांच्या अफेअरबाबत मला सगळ्यात आधी माहीत व्हायचं. पण त्या सगळ्या गोष्टी फक्त वन नाईट स्टँड असल्याचं मला माहीत होतं. काही वर्षांपूर्वी या गोष्टीवरुन आमच्यात वाद व्हायचे. पण आता मी माझं वागणं बदललं आहे. शेवटी हे सगळं ते कधीपर्यंत करणार आहेत? ,” असं नीतू कपूर म्हणाल्या होत्या.
हेही वाचा>> सचिन तेंडुलकरच्या लेकीचं हटके फोटोशूट, साराच्या फोटोवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स, म्हणाले “या हॉटेलमध्ये शुबमन…”
“मला त्यांच्या अफेअरची माहिती कशी होते? असा प्रश्न ऋषी कपूर यांना नेहमी पडायचा. माझे अनेक मित्र आहेत, ज्यांच्याकडून मला या गोष्टी कळतात. तुमच्या अफेअरबद्दल मला माहीत आहे, हे सगळं विसरुन जा, असं मी त्यांना सांगते. ऋषी कपूरही माझं हे बोलणं ऐकतात. आम्हाला एकमेकांबद्दल पूर्ण खात्री आहे. त्यांच्यासाठी त्यांचं कुटुंब सगळं काही आहे. ते कुटुंबाला प्राधान्य देतात, हे मला माहीत आहे. मग मी कशाला चिंता करू? ते मला कधीच सोडणार नाहीत. पुरुषांना थोडं स्वातंत्र्य दिलं गेलं पाहिजे. ऋषी कपूर यांनी लाँग टर्म अफेअर केलं तर मी त्यांना घरातून बाहेर काढेन. तिच्याबरोबरच जाऊन राहा, असं मी त्यांना म्हणेन,” असंही मुलाखतीत नीतू कपूर यांनी सांगितलं होतं.