सलीम खान आणि जावेद अख्तर या जोडीने बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट चित्रपटांच लेखन केलं आहे. त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक अभिनेत्यांना सुपरस्टार बनवले आहे. एक काळ असा होता की सलीम-जावेद लिखित चित्रपटात प्रत्येक अभिनेत्याला काम करायचे होते कारण त्यांची कथा इतकी जबरदस्त होती की चित्रपट सुपरहिट ठरला होता. पण एकदा ऋषी कपूर यांनी त्यांना त्यांच्या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. ऋषी कपूर यांच्या नकारामुळे सलीम खानला राग आला आणि सलीम यांनी ऋषी कपूर यांना त्याचे करिअर बरबाद करण्याची धमकी दिली होती.

हेही वाचा- Video : “जीजू कैसे हैं?” पापाराझींचा प्रश्न ऐकून कियारा अडवाणी काहिशी लाजली अन् म्हणाली…

ऋषी कपूर यांनी त्यांच्या ‘खुल्लम खुल्ला’ या आत्मचरित्रात हा किस्सा सांगितला आहे. सलीम-जावेद यांनी ऋषी कपूर यांना ‘त्रिशूल’ चित्रपटाची ऑफर दिली होती. पण ज्या पद्धतीने हे पात्र लिहीले गेले ते ऋषी कपूर यांना अजिबात आवडले नाही. यानंतर त्यांनी चित्रपटात काम करण्यास नकार दिला. यामुळे सलीम खान त्यांच्यावर चांगलेच चिडले.

आपल्या चरित्रात, ऋषी कपूर यांनी दावा केला होता की त्या काळात भारतीय चित्रपटसृष्टीतील ऋषी कपूर पहिले अभिनेते होता ज्यांनी सलीम-जावेदचा चित्रपट नाकारला होता. यानंतर सलीम खान ऋषी कपूर यांच्यावर चांगलेच चिडले होते. ऋषी कपूर यांच्या म्हणण्यानुसार, सलीम खान मला म्हणाले, ‘सलीम-जावेदचा चित्रपट नाकारण्याची तुझी हिंम्मत कशी झाली?’ ऋषी कपूर म्हणाले, ‘मला भूमिका आवडली नाही.’ तेव्हा सलीम खान म्हणाले, ‘तुला माहित आहे का? आजपर्यंत कोणीही आम्हाला नाही म्हटले आहे. आम्ही तुझे करिअर खराब करू शकतो.

हेही वाचा-

ऋषी कपूरच्या म्हणण्यानुसार, सलीम जावेद पुढे म्हणाले, “तुझ्याबरोबर कोण काम करेल? राजेश खन्ना यांना आम्ही ‘जंजीर’ ऑफर केली होती. पण त्यांनी नकार दिला होता हे तुला माहीत आहे. आम्ही काही केले नाही. आम्ही एक नवीन पर्याय शोधला. नंतर अमिताभ बच्चनने राजेश खन्नाचे करिअर उद्ध्वस्त केले. आम्ही तुझ्याबरोबरही असेच करू.”

हेही वाचा- तमन्ना भाटियाच्या ‘या’ सवयीचा विजय वर्माला येतो खूप राग; खुलासा करत अभिनेता म्हणाला…

ऋषी कपूर यांनी सलीम-जावेदच्या धमकीकडे दुर्लक्ष केले, पण त्यांना सर्वाधिक आनंद झाला जेव्हा त्यांचा ‘अमर अकबर अँथनी’ सुपरहिट झाला. तर सलीम-जावेदचा ‘इमान धरम’ चित्रपट फ्लॉप झाला. सलीम-जावेद लिखित ‘त्रिशूल’ हा चित्रपट १९७८ साली प्रदर्शित झाला होता. यश चोप्रा दिग्दर्शित या चित्रपटात अमिताभ बच्चन, शशी कपूर, संजीव कुमार, राखी गुलजार, वहिदा रहमान, हेमा मालिनी, प्रेम चोप्रा, पूनम ढिल्लन आणि सचिन पिळगावकर यांसारख्या कलाकारांनी काम केले होते.